जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या शहरात दोन चोऱ्या,लाखांचा ऐवज लंपास !

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस आगारात काल अहिल्यानगर,नागापूर येथील फिर्यादी महिला जयश्री केरू वाघ (वय-50) कोपरगाव बस स्थानक येथे बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बॅग मध्ये ठेवलेले 60 हजार रुपयांचे सोन्याचे मनिमंगळसुत्र चोरुन नेले असताना दुसरा गुन्हा शहराचे उपनगर असलेल्या समतानगर येथे घडला असून येथील फिर्यादी इसम अकिल रज्जाक शेख (वय-45) यांच्या घराचे कुलूप तोडून 38 हजार 100 अशी रोख रक्कम पायातील जोडवे असा जवळपास चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या समतानगर येथील पथदिवे बंद असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेत वारंवार तक्रार केली होती.मात्र याची वेळीच दखल घेतली नाही परिणामी नागरिकांच्या चोऱ्या वाढल्या असून कोपरगाव नगरपरिषद प्रशासन याची दखल घेणार का ?-स्मिता शैलेश साबळे,नगरसेवक,राष्ट्रवादी (अजित पवार गट)

   कोपरगाव शहर आणि चोरटे यांचे समीकरण भलतेच विचित्र असल्याचे मानले जात आहे.कोपरगाव शहरात पोलिस अधिकारी कोणी येवो त्यांना फार फरक पडताना दिसून येत नाही.त्यांचे चोऱ्यांचे काम बिनधास्त आणि बिनबोभाट सुरू राहत असल्याचे दिसून येत आहे.चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला असे म्हणणे धाडसाचे ठरेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत उन्हाळी अधिवेशनात आवाज उठवून फार फरक पडला असे म्हणणे धाडसाचे ठरेल.वर्तमानात याचा दाहक अनुभव नागरिकांना येत आहे.अशीच घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस आगारात काल घडली आहे.यातील अहिल्यानगर येथील वक्रतुंड रो-हाऊसींग सोसायटी,नवनागापुर येथील फिर्यादी महिला जयश्री वाघ या काल दुपारी 02 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांचेवर लक्ष ठेवून त्यांच्या पिशवीतील ४० हजार रुपये किमतीचे काळे मनी असलेली सोन्याचे 08 ग्रॅम वजनाचे मनिमंगळसुत्र २० हजार रुपये किंमतीचे काळे मनी असलेली 03 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनिमंगळसुत्र असा 60 हजार रुपयांचा ऐवजावर चांगलाच हात मारला आहे.

   दरम्यान दुसऱ्या घटनेत काल रात्री कधीतरी चोरट्यांनी समतानगर,ईशानेश्वर मंदिराजवळ रहिवासी असलेले इसम अकिल रज्जाक शेख हे आपल्या मुलीचे बाळंतपण आणि सिझर असल्याने त्यांचे मुलीवर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होतें.त्यामुळे गेली चार-पाच दिवस त्यांचे लोणी येथे डबा घेऊन जाणे येणे वाढले होते.त्यावर पाळत ठेवत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी इसम आणि पत्नी आणि मुलीसह दवाखान्यात असताना त्यांच्या घरी कोणी नाही याची संधी साधत त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात आत प्रवेश करून घरातील कपाटाची तोडफोड करून त्यातील चीजवस्तूंची उचकपाचक करून त्यातील रोख रक्कम 35 हजार रुपये तर मुलीच्या पिशवीत ठेवलेल्या पर्स मधील रोख 03 हजार 100 असा एकूण 38 हजार 100 रुपयांची रोकड आणि पिशवीत ठेवलेले मुलीच्या पायातील जोडवे असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत त्यांना त्यांचे शेजारी बापू पुणेकर यांना सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात आली.त्यांनी फिर्यादी इसम अकिल शेख यांना लोणी येथे दूरध्वनी करून याची खबर दिली होती.त्यांनी तातडीने घराकडे धाव घेऊन पाहणी केली असता हा प्रकार लक्षात आला आहे.त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मात्र याबाबत शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार यांनी आज सायंकाळी 05.02 वाजता संपर्क केला असता या घटनेला दुजोरा दिला नाही हे विशेष !

  दरम्यान याबाबत समता नगर येथील फिर्यादी अकिल शेख यांनी गुन्हा घडला असून तो दाखल केला असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल न्यानेश्वर भांगरे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

  दरम्यान याबाबत कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या समतानगर येथील पथदिवे बंद असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेत वारंवार तक्रार केली होती.मात्र याची वेळीच दखल घेतली नाही परिणामी नागरिकांच्या चोऱ्या वाढल्या असून कोपरगाव नगरपरिषद प्रशासन याची दखल घेणार का ? असा संतप्त सवाल कोपरगाव नगरपरिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्मिता शैलेश साबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close