जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

स्व.विलासराव देशमुख यांना विसरणे अशक्य -..यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी राज्याच्या हिताची अनेक कामे केली असल्याने त्यांना आपल्यालां विसरणे अशक्य असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी नुकतेच केला कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

“स्व.विलासराव देशमुख यांनी आपल्या काळात अनेक लोकप्रिय योजना राबवल्या होत्या.ते महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अत्यंत बुद्धिमान,अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व मानले जात होते.मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आदी अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी सांभाळले होते.केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता”-अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी,कोपरगाव.

      स्व.विलासराव देशमुख हे मराठी राजकारणी होते.इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स.१९९९ ते १६ जानेवारी, इ.स.२००३ व १ नोव्हेंबर,इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.त्यांनी आपल्या काळात अनेक लोकप्रिय योजना राबवल्या होत्या.ते महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अत्यंत बुद्धिमान,अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व मानले जात होते.मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आदी अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी सांभाळले होते.केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.गाव पातळीवरच्या स्थानिक राजकारणातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले कै.विलासराव देशमुख हे देशातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिमत्वापैकी एक होते.त्यांची जयंती नुकतीच कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांचेसह कला शाखेचे प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे,वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ.संतोष पगारे,रजिस्ट्रार डॉ.ए.सी.नाईकवाडे,आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.गणेश शिंदे,राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख प्रा.एस.एस.नागरे,डॉ.एस.एम.देवरे,तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद,कार्यालयीन सेवकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

  यावेळी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी देखील विलासराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे.यावेळी प्रारंभी कै.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली आहे.यावेळी सूत्रसंचलन डॉ.जिभाऊ मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.एस.एम.देवरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close