जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले त्यांचा सत्कार स्वीकारणार नाही-..या अध्यक्षांचा खुलासा

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  ज्या नेत्यांनी कोपरगावसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७५ वर्षे लुटले त्यांचा सत्कार आपण स्वीकारणार नाही असे प्रतिपादन कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

माजी खा.बडदे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलताना वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे दिसत आहे.

“मला माजी खा.भीमराई बडदे यांच्यामुळेच शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख निर्माण झाली होती.त्यांचे सहवासात अनेक तरुण आले.त्यांच्या समवेत अनेक क्रीडा स्पर्धा खेळता आल्या,गणेश उत्सव साजरे करण्यात आले असल्याचे पहावयास मिळाले होते.लोकसभा निवडणुकीत दिवसाचे २४ तासातील २२ तास वेळ देत असल्याचे पहावयास मिळाले आहे.त्यावेळी त्यांच्या मुळे आपला लग्नाचा मुहूर्त थोडक्यात हुकण्यावरून वाचला असल्याचा अनुभव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी यांनी सांगून उपस्थितांना खळखळून हसवले आहे.

  माजी खा.स्व.भिमराव विष्णू बडदे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते.ते १९९६ मध्ये महाराष्ट्रातील कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून मुरब्बी राजकारणी माजी खा.स्व.शंकरराव काळे यांचा पराभव करून खासदार म्हणून बहुमताने निवडून आले होते.त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९४७ रोजी झाला होता.त्यांचे संपूर्ण कुटुंब आधी जनसंघ नंतर राष्ट्रीय सव्यंसेवक संघ,आणि नंतर भाजपशी जोडले गेले होते.त्यांनी १९७८ साली आणीबाणीच्या काळात कारागृहाची शिक्षा भोगली होती.त्यांनी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली होती.सन -१९९६च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रभावी वकृत्वाने अनेक निवडणूक सभा गाजवल्या होत्या.परिणामी ते पहिल्याच निवडणुकीत विजयी होऊन थेट लोकसभेत पोहचले होते.त्यामुळे त्यांचे नाव देश आणि राज्यभर गाजले होते.मात्र पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वाभिमानाने मुदतपूर्व राजीनामा दिल्याने यांचे सरकार गडगडले होते.आणि देशात नव्याने लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.त्यामुळे खा.बडदे यांना अल्पकाळ मिळाला होता.मात्र या अल्प काळात त्यांनी कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते तर अनेक प्रश्नांना संसदेत वाचा फोडली होती.त्यांच्या ७९ व्या जयंती कोपरगाव वकील संघाच्या वतीने वकील संघाच्या सभागृहात आज मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली त्यावेळी त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी बोलतानाचा क्षण.

दरम्यान यावेळी लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,माजी खा.भीमराव बडदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली असून त्यांच्या विचाराचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,ॲड.शिरीषकुमार लोहकणे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे,उपाध्यक्ष ॲड.निलेश कातकडे,महिला उपाध्यक्ष ॲड.करुणा सोनवणे,सचिव ॲड.दिपक जाधव,सहसचिव ॲड.प्रशांत मोकळ,खजिनदार ॲड.राहुल वाकचौरे,माजी उपाध्यक्ष रमेश गव्हाणे,ॲड. अतिश आगवण,ॲड.महेश सोनवणे,ॲड.सी.एम.वाबळे,ॲड.नितीन पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

“स्वर्गीय लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,माजी खा.भीमराव बडदे या मान्यवर नेत्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध लढून सामन्यांना न्याय दिला आहे.स्व.खा.बडदे यांचे तिन्ही भाऊ कारागृहात राहिले मात्र प्रस्थापितांना शरण गेले नाही.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले काम नक्कीच उच्च दर्जाचे होते”-ॲड.मच्छिंद्र खिल्लारी,माजी अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.

   यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण कायम न्यायाच्या बाजूने राहिलो आहे.आपण माजी खा.भीमराव बडदे यांच्या सहवासात घडलो असून अन्यायाच्या विरुद्ध लढत आलो आहे.यापुढील काळात लढत राहणार आहे.आपण कोपरगाव वकील संघाची निवडणूक विजयी झाल्यावर कोपरगाव तालुक्यातील अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आडमार्गाने आपल्याला सत्काराला बोलावले पण आपण त्यांचा सत्कार स्वाभिमानाने नाकारला आहे.ज्यांनी शेतकऱ्यांना नागवले त्यांचा सत्कार स्वीकारणे ही बाब न्यायाला धरून नाही.शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विचारधारेच्या विरुद्ध आपली लढाई आगामी काळातही सुरूच राहणार असल्याचे सांगून कोपरगाव वकील संघाच्या विकासकामांना कोणीही अडथळा आणणार नसल्याचे त्यांनी सांगून आणला तरी त्यांना ओलांडून कसे काम करायचे हे आम्हाला ठावूक असल्याचे सांगून आगामी काळात शेतकरी प्रश्नाला वाचा फुटणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे अप्रत्यक्ष कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आगामी काळात वकील संघाचे नवोदित अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे हे शेतकऱ्यांसाठी अपेक्षेप्रमाणे लढणार असल्याचे उघड झाले आहे.

  त्यावेळी त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव विषद केले.त्यावेळी पुण्यात विद्यार्थी असताना फर्ग्युसन महाविद्यालयात रात्री १२ नंतर वसतिगृह बंद व्हायचे त्यामुळे चित्रपट पाहून आल्यावर वसतिगृहात जाण्याची आमची आणि सहकाऱ्यांची पंचाईत व्हायची त्याविरुद्ध आपण दुसऱ्या आंदोलनाचे निमित्त पुढे करून ते सुरू ठेवण्यासाठी प्राचार्यांवर मोर्चा काढला असल्याची आठवण केली आहे.त्यावेळी आपण आणि माजी खा.भीमराव बडदे यांच्या समवेत ऊसाच्या भाव वाढीवर आंदोलन केले त्यावेळी खा.भीमराव आंबेडकर यांच्या मैदानात प्रस्थापित नेत्यांच्या कार्यकर्त्यांशी हाणामारी केल्याची आठवण करून दिली आहे.त्यावेळी आम्हाला साक्षीदार मिळाला नाही.मात्र स्व.भीमराव बडदे हे आपल्याला साक्षीदार झाले असल्याची आठवण करून दिली.अनेक अडचणींचा विरोध पत्करून त्यांनी आपल्याला साथ दिली आहे.ते कोणाच्या प्रलोभनाला आणि पैशाला बळी पडले नाही याची आठवण करून दिली आहे.त्या साक्षीने आरोपीला शिक्षा झाली आहे.याच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.त्यांनी अनेकवेळा मला पतितपावन संघटनेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली होती.पण ती विनम्रपणे नाकारली असल्याचे सांगितले आहे.आपल्याला काही प्रस्थापित राजकीय नेत्यांनी सत्काराला बोलावले पण आपण त्यांचा सत्कार आपण नाकारला आहे.ज्या नेत्यांनी कोपरगावसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७५ वर्षे लुटले त्यांचा सत्कार आपण स्वीकारणार नाही.आपण पदावर असताना आपल्याला कोणी अडचण आणणार नाही.आणली तरी त्यांना सरळ करण्याची क्षमता आपण राखून असल्याचे सांगून त्यावेळी अनेक अन्यायाविरुद्ध थेट भिडून लढाया केल्याचे सांगून उपस्थितांत चांगलीच खसखस पिकवली आहे.

  यावेळी वकील ॲड.जयंत जोशी म्हणाले,”मला माजी खा.भीमराई बडदे यांच्यामुळेच शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख निर्माण झाली होती.त्यांचे सहवासात अनेक तरुण आले.त्यांच्या समवेत अनेक क्रीडा स्पर्धा खेळता आल्या,गणेश उत्सव साजरे करण्यात आले असल्याचे पहावयास मिळाले होते.लोकसभा निवडणुकीत दिवसाचे २४ तासातील २२ तास वेळ देत असल्याचे पहावयास मिळाले आहे.त्यांना दुर्दैवाने अल्पकाळ मिळाला आहे.कोपरगाव येथे जिल्हा न्यायालय आणण्यात मोठा वाटा होता.त्यांनी आपल्या लग्नाची आठवण सांगितली त्यावेळी अनेकाना हसू आवरले नाही.तत्कालीन भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत आर.एस.एस.ची शाखा काढण्याची जबाबदारी माजी खा.भीमराव बडदे याच्यावर सोपवली होती याची आठवण करून दिली आहे.
दरम्यान यावेळी ॲड.सी.एम.वाबळे यांनी लोकमान्य टिळक,लोकशाहीर साठे यांच्या आठवणी जागवल्या आहेत.तर ॲड.एम.पी.गुजराथी,ॲड.एस.एम.मोकळं,ॲड.आर.जे.शेख,ॲड.अमोल टेके,ॲड.दिपक पोळ,माजी खा.स्व.भीमराव बडदे,लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कामाच्या स्मृती जागवल्या आहेत.

  सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.नीलेश कातकडे यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन ॲड.दिपक जाधव यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्षा ॲड.करुणा सोनवणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close