आंदोलन
शिर्डीच्या अवजड वाहतुकीला दुष्काळी गावांचा विरोध,आंदोलनाचा इशारा !

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचा भाग असलेल्या शिर्डी-सावळीविहिर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शिर्डी पोलिसांनी सदर मार्गावरील वाहतूक आधीच मरणासन्न असलेल्या पुणतांबा – फाटा,झगडेफाटा-पोहेगाव -जवळके-तळेगाव दिघे मार्गे वळवली असून ही गोष्ट संतापजनक असून ही वाहतूक तत्काळ बंद करावी अन्यथा निळवंडे कालवा कृती समिती आंदोलन करील असा इशारा समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

दरम्यान वडगाव पान ते झगडे फाटा या मार्गावर किती अपघात झाले ? आणि त्यात किती प्रवासी आणि नागरिकांचे बळी गेले ? किती वित्तीय हानी झाली याची उच्च न्यायालयात जाण्यासाठी व जनहित याचिका दाखल करण्यासाठी,”माहिती अधिकारात” दि.29 मे 2026 रोजी मागितली असता जिल्हा पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी,शिर्डी आदींनी सदर माहिती विश्लेषणात्मक,विस्तृत व वेगळ्याने माहिती संकलन,संशोधन करावे लागणार आहे”अशा स्वरूपाची असल्याने तिला केराची टोपली दाखवली आहे.तेच अधिकारी आता या मार्गावर वाहतूक वळवून,”आपण किती असंवेदनशील आहे” याची चुणूक दाखवून देत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी वर्षात बारा वर्षानी येणारा सिंहस्थ कुंभमेळा येत आहे.त्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासोबतच अन्य प्रमुख पर्वणींसाठी मोठ्या संख्येने दूरदूरवरुन लाखो भाविक नाशिकच्या पुण्यनगरीत येणार आहेत.या काळात भाविकांची वाढती संख्या तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर,शिर्डी आदी तीर्थक्षेत्रात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे.कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने,नाशिक संलग्न रस्त्यांच्या वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि विकास कामांना निधी मंजूर केला आहे.शिर्डी संलग्न रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर केला आहे.मात्र शिर्डीचा बाह्य वळण रस्ता होण्याचे आधी ज्या राज्य मार्ग क्रमांक 65 वरून पुणतांबा फाटा-झगडे फाटा पोहेगाव -जवळके-तळेगाव दिघे मार्गे शिर्डीची अवजड वाहतूक वळवली त्या मार्गाला फुटकी कवडी दिली नाही.त्याबाबत निळवंडे कालवा कृती समिती,जनमंगल ग्रामविकास संस्था,जवळके,बहादराबाद,बहादरपुर,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,सायाळे आदी ग्रामपंचायतीनी ग्रामसभा ठराव घेऊन कालवा कृती समितीं’चे संस्थापक नानासाहेब जवरे यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,सिंहस्थ कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष व मंत्री गिरीश महाजन,मुख्य अभियंता,कोकण विभाग मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उपअभियंता कोपरगाव आदींना लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.मात्र त्यासाठी सरकारने आणि सरकारच्या मंत्र्यांनी फुटक्या कवडीची तरतूद केली नाही.आता या मार्गावरून शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रांची अवजड वाहतूक सन-1995 पासून वळवली आहे.आधीच मरणासन्न असलेल्या या पुणतांबा-फाटा,झगडेफाटा-पोहेगाव-जवळके-तळेगाव दिघे मार्गे ही वाहतूक पुन्हा एकदा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वळवली असून या मार्गावर तीस वर्षापासून वाहतूक वळवून त्याचा पार सत्यानाश केला आहे.त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन विद्यार्थी,प्रवासी,ग्रामस्थांचे अनेक बळी गेलेले आहे.असाच एका अपघातात 23 जानेवारी 2026 मध्ये अंजनापुर शिवारात म्हसोबा मंदिराजवळ अपघात होऊन शालेय विद्यार्थी गुरुत्व कैलास गाढे या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा अवजड कंटेनरखाली मृत्यू झाला होता.त्यावेळी संतापून ग्रामस्थानी जवळपास चार तास,”रास्ता रोको’ करून प्रशासनाला त्यांची जागा दाखवून दिली होती.त्याबाबत लोकसभा खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे यांना वारंवार विनवणी आणि पत्रव्यवहार केला आहे.मात्र तात्पुरती डागडुजी करून त्याबाबत ठोस आर्थिक तरतूद न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करून सारवासारव केली जात आहे.परिणामी हा रस्ता,”जैसे थे” होत असून जनतेला मरण्यासाठी वाऱ्यावर सोडले जात आहे.त्यावेळी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला होता.मात्र त्यानंतर अद्याप या रस्त्यावर फुटकी कवडी आर्थिक तरतूद केलेली नाही.आणि काल पुन्हा शिर्डी पोलिसांनी याच मार्गावर पुन्हा पुणतांबा फाटा या ठिकाणाहून शिर्डीची अवजड वाहतूक वळवली आहे.ही विचार करण्यासारखी गोष्ट असून या आदेशाबाबत ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.

“वडगाव पान ते तळेगाव दिघे-झगडे फाटा या राज्य मार्ग क्रमांक 65 वर कि.मी.69.00 ते 103.200 असा एकूण 34.200 कि.मी.च्या मार्गासाठी मात्र फुटक्या कवडीची तरतूद केली नाही.राज्य शासनाने में.आर्किटेक्नो कन्सल्टंट इंडिया ली.चेतक इंजिनियर्स ली.पुणे यांची दिनांक 25 सप्टेंबर 2020 या आदेशानुसार अधीक्षक अभियंता डी.डी.कुलकर्णी यांची नेमणूक करून या रस्त्याची पाहणी करून त्यावेळी त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.आणि आय.आर.सी.च्या माणकांनुसार हा रस्ता 10 मीटर ऐवजी चौपदरी काँक्रीटीकरण करण्याची शिफारस केली होती.मध्यंतरी एशियन डेव्हलपमेंट बँकेने 89 कोटींची शिफारस केली होती.मात्र राजकीय पाठपुराव्या अभावी तो निधी अप्राप्त राहिला होता.मात्र त्याला अद्याप तरी सार्वजनिक बांधकामा विभागाने वाटण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत”-सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत.
दरम्यान शिर्डीला नाशिकवरून जाण्यासाठी वावी-सायाळे-जवळके हा जवळचा आणि वेळ आणि पैसा वाचवणारा मार्ग सोडून सिन्नर-नांदूर शिंगोटे-तळेगाव-दिघे-लोहारे-गोगलगाव-लोणी मार्गे निर्मळ-पिंपरी मार्गे रस्ता काढून संबंधित मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने आपल्या अकेलेचे दिवाळे काढले आहे.वडगाव पान ते तळेगाव दिघे-झगडे फाटा या राज्य मार्ग क्रमांक 65 वर कि.मी.69.00 ते 103.200 असा एकूण 34.200 कि.मी.च्या मार्गासाठी मात्र फुटक्या कवडीची तरतूद केली नाही.राज्य शासनाने में.आर्किटेक्नो कन्सल्टंट इंडिया ली.चेतक इंजिनियर्स ली.पुणे यांची दिनांक 25 सप्टेंबर 2020 या आदेशानुसार अधीक्षक अभियंता डी.डी.कुलकर्णी यांची नेमणूक करून या रस्त्याची पाहणी करून त्यावेळी त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.आणि आय.आर.सी.च्या माणकांनुसार हा रस्ता 10 मीटर ऐवजी चौपदरी काँक्रीटीकरण करण्याची शिफारस केली होती.मात्र त्याला अद्याप तरी सार्वजनिक बांधकामा विभागाने वाटण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत.या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय महामार्ग आहेत.केवळ मधील 34.200 किमी.मार्ग जर राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केला तर त्याची कायम दारिद्रय हटले जाणार आहे.पण याकडे पाहण्यासाठी कोणाही नेत्याला वेळ नाही.निळवंडे कालवा कृती समितीं याबाबत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे यांचे माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले आहे.मात्र त्या आधी पोलिस आणि जिल्हाधिकारी यांनी या रस्त्याची वाट लावण्याची शपथ खाल्ली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कालवा कृती समितीसह दुष्काळी गावातील ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.व जर ही वाहतूक दोन दिवसात बंद केली नाही तर या मार्गावरील वाहतूक आंदोलन करून बंद पाडली जाईल याला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही शेवटी कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी शेवटी दिला आहे.

शिर्डीला नाशिकवरून जाण्यासाठी वावी-सायाळे-जवळके हा जवळचा आणि वेळ आणि पैसा वाचवणारा मार्ग सोडून सिन्नर-नांदूर शिंगोटे-तळेगाव-दिघे-लोहारे-गोगलगाव-लोणी मार्गे निर्मळ-पिंपरी मार्गे रस्ता काढून संबंधित मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने आपल्या अकेलेचे दिवाळे काढले आहे.वडगाव पान ते तळेगाव दिघे-झगडे फाटा या राज्य मार्ग क्रमांक 65 वर कि.मी.69.00 ते 103.200 असा एकूण 34.200 कि.मी.च्या मार्गासाठी मात्र फुटक्या कवडीची तरतूद केली नाही.आणखी वरुण या मार्गावर अवजड वाहतूक वळवून अधिकाऱ्यांनी आपली असंवेदनशीलता दाखवून दिली आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान या रस्त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी,खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,कोकण सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
दरम्यान वडगाव पान ते झगडे फाटा या मार्गावर किती अपघात झाले ? आणि त्यात किती प्रवासी आणि नागरिकांचे बळी गेले ? किती वित्तीय हानी झाली याची उच्च न्यायालयात जाण्यासाठी व जनहित याचिका दाखल करण्यासाठी,”माहिती अधिकारात” दि.29 मे 2026 रोजी मागितली असता जिल्हा पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी,शिर्डी आदींनी सदर माहिती विश्लेषणात्मक,विस्तृत व वेगळ्याने माहिती संकलन,संशोधन करावे लागणार आहे”अशा स्वरूपाची असल्याने तिला केराची टोपली दाखवली आहे.तेच अधिकारी आता या मार्गावर वाहतूक वळवून,”आपण किती असंवेदनशील आहे” याची चुणूक दाखवून देत आहे.त्या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला आहे.



