जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

नगर-मनमाड रस्त्यासाठी आंदोलन सुरू -पाठिंबा वाढला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)
  
   अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज कोपरगाव ते अहिल्यानगर सुमारे ११० किलोमीटर दरम्यान अर्धनग्न पायी आंदोलन सूर केले आहे.त्यासाठी सामाजिक संकेत स्थळावर तीव्र प्रतिक्रियांचा पूर आला असून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा देणाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला असल्याचे दिसून येत आहे.संजय काळे यांच्या या आंदोलनामुळे निष्क्रीय पुढारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे निर्ढावलेले अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज आंदोलन सुरू केले तो क्षण.

“नगर–मनमाड रस्त्याची झालेली अत्यंत दुरावस्था ही आज सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे.या रस्त्यावर वाढत्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.हा प्रश्न केवळ रस्त्याचा नसून,सर्वसामान्यांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजय काळे यांनी अर्धनग्न होऊन पायी नगरपर्यंत पदयात्रा काढून सत्याग्रह करण्याचा निर्धार केला आहे.अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत सातत्याने आंदोलने आणि संघर्ष केले आहेत.त्यामुळे हा लढा त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून,सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे.त्यामुळे आमचा आणि महिलांचा त्याला पाठिंबा आहे”-विमल पुंडे,माजी अध्यक्षा,एकनाथ शिंदे सेना,नगर जिल्हा.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”अहिल्यानगर-मनमाड रस्त्याची झालेली अत्यंत दुरवस्था आणि मोठे खड्डे पडलेले आहे.त्यामुळे अनेक अपघात होत असून अनेक जण जायबंदी होत आहे.यापूर्वीही या मार्गावर अनेक संघटना आणि नागरिकांनी आंदोलन करून लक्ष वेधून घेतले आहे.मात्र मुर्दाड,लाचखोर अधिकारी आणि कर्तव्यशून्य आणि कमिशंखोर पुढारी आणि मताचे पैसे घेणारे लाचार मतदार या तिहेरी दृष्टचक्रात हा राष्ट्रीय महामार्ग अडकला आहे.परिणामी या मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना आपले आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते अहिल्यानगर असा तब्बल ११० किलोमीटरचा प्रवास अर्धनग्न अवस्थेत पायी सुरू केला आहे.त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पुढारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.त्यांनी आपल्या पत्रकात आरोप करताना कोपरगाव साई कॉर्नर ते संजीवनी कारखाना या दोन किलोमीटर रस्त्यासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा आरोप केला आहे.पण यापूर्वी केलेल्या कामाची अवघ्या पाच वर्षांत दुर्दशा झाल्याने त्यांनी या कामातील भ्रष्टाचारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहे.अहिल्यानगर-कोपरगाव हा मार्ग शिर्डी,शनी शिंगणापूर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांना व गुजरात,मध्यप्रदेश आदी उतर आणि दक्षिणेकडील राज्यांना प्रवासी आणि मालवाहतुकीला जोडतो.तरीही या मार्गाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांमधून पराकोटीचा संताप व्यक्त होत आहे.त्याला वाचा फोडण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सुरू केले आहे.मात्र मुर्दाड मतदार  याला किती प्रतिसाद देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे  लक्ष लागून राहिले आहे.

विमल पुंडे,माजी जिल्हाध्यक्षा,शिवसेना एकनाथ शिंदे गट.

“नगर-मनमाड मार्गावर नागरिकांचे आणि प्रवाशांचे जाणारे हकनाक बळी थांबवण्यासाठी हे आंदोलन योग्य असून सरकारी आणि राजकीय अनास्था यामुळे अनेकांचे बळी जात असून वित्तीय हानीची कोणतीही मोजदाद नाही.या रस्त्यावरील अपघातांची माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस यंत्रणा भेकड असल्यासारखी आणि राजकीय दबावात माहिती देत नाही त्यामुळे या यंत्रणेवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याची गरज आहे”-रूपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

  दरम्यान या आंदोलनाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी जिल्हाध्यक्षा विमल पुंडे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”नगर–मनमाड रस्त्याची झालेली अत्यंत दुरावस्था ही आज सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे.या रस्त्यावर वाढत्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.हा प्रश्न केवळ रस्त्याचा नसून,सर्वसामान्यांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजय काळे यांनी अर्धनग्न होऊन पायी नगरपर्यंत पदयात्रा काढून सत्याग्रह करण्याचा निर्धार केला आहे.अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत सातत्याने आंदोलने आणि संघर्ष केले आहेत.त्यामुळे हा लढा त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून,सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे.त्यामुळे संजय काळे यांच्या या धाडसी आणि निःस्वार्थ संघर्षाला सर्व महिला मनापासून पाठिंबा देत असल्याचे योग शिक्षिका विमल पुंडे व त्यांच्या सर्व योग साधिका यांनी म्हटले आहे.

रूपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती.

   दरम्यान कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेद्र काले यांनी पाठिंबा दर्शवला आहे.नागरिकांचे आणि प्रवाशांचे जाणारे हकनाक बळी थांबवण्यासाठी हे आंदोलन योग्य असून सरकारी आणि राजकीय अनास्था यामुळे अनेकांचे बळी जात असून वित्तीय हानीची कोणतीही मोजदाद नाही.या रस्त्यावरील अपघातांची माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस यंत्रणा भेकड असल्यासारखी आणि राजकीय दबावात माहिती देत नाही त्यामुळे या यंत्रणेवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close