पशुसंवर्धन विकास
पशुधनाच्या अनुवंशीक मूल्यमापनासाठी…या संस्थेचा उपक्रम स्तुत्य-डौले

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संकरीत गाईंना होणारे आजार,त्यांची प्रजनन व दूध देण्याची क्षमता तसेच पशुधनाच्या अनुवंशीक मूल्यमापनासाठी गोदावरी खोरे दूध संघाने बायफ संस्थेच्या सहकार्याने सुरु केलेली प्रयोगशाळा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील मोठी क्रांती असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कोपरगांव येथील कार्यक्रमात केले आहे.

“गाईंच्या गर्भावस्थेतील काही अनुवंशिक विकाराबरोबरच इतर विकार समजण्यास तसेच कोणत्या विकारासाठी कोणती औषधी परिणामकारक ठरु शकतील याची अचूक माहिती जेनोमिक चाचणीच्या माध्यमातून समजणार आहे.जनावरांची जात,उत्पादन क्षमता,दूध देण्याची क्षमता,रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याबरोबरच उच्च गुणवत्तेच्या जनावरांची निवड करणे व जातीवंत पैदास करण्यासाठी उत्कृष्ठ वंशावळीचे व अनुवंशीक दोष नसलेले नर (बैल / रेडे) निवडण्यासाठीही या चाचणीचा उपयोग होणार आहे”- शीतलकुमार मुकणे,अतिरिक्त आयुक्त,पशुसंवर्धन विभाग.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावरील गोदावरी व वायफ संस्था यांच्या संयुक्तिक पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये नव्याने सुरु होत असलेल्या अनुवंशीक गुणवत्ता तपासणी व संकरीत गाईंमधील देशी व विदेशी रक्तांचे अचूक प्रमाण शोधणे (जेनोमिक व ग्रीड कंपोझिशन टेस्ट) या नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सदर प्रसंगी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी खा.डॉ.सुजय विखे हे कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी होते.

कोपरगाव तालुक्याला आता दोन दोन आमदार आले असून त्यांनी आपले काम इमाने इतबारे करावे,आपल्या तालुक्याचा विकास करावा इतर तालुक्यात चुबुक डुबक करू नये.आम्हाला ती येते मात्र आम्ही मर्यादा ओलांडत नाही मात्र कोणी तसा गैरसमज करून घेणार असेल तर त्याचा आम्ही उपयोग करू शकतो असा इशारा खा.सुजय विखे यांनी आ.विवेक कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.
यावेळी तर पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.शितलकुमार मुकणे,पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे माजी उपायुक्त डॉ.सुनील तुंबारे,बायफ संस्थेचे प्रादेशिक संचालक डॉ.रवीराज जाधव,बायफचे उरळीकांचन येथील डॉ.सचिन जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जेनोमिक टेस्ट ही पशुधनाची अनुवंशीक गुणवत्ता तपासणीची एक जनुकीय (डीएनए) टेस्ट आहे.जी लहान वयातच वासरु किंवा कालवडीची भविष्यातील क्षमता सांगते.गाईची रोगप्रतिकारक शक्ती व प्रजनन क्षमता कशी असेल तसेच गाय किंवा म्हैस जन्माला आल्यापासून लहान वयातच तिची दूध देण्याची क्षमता आणि फॅटची टक्केवारी या जनुकीय चाचणीद्वारे ओळखता येणार असल्याचे सांगून श्री डवले यांनी गोदावरी दूध संघामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी माजी खा.डॉ.सुजय विखे यांनी आपल्या भाषणांमधून राज्याचा पशुसंवर्धन विभाग हा दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेला अतिशय महत्त्वाचा विभाग आहे.शासन पातळीवर या विभागासाठी अधिकच्या निधीची तरतूद आणि सवलती मिळाल्यास दुग्ध व्यवसायाला बळकटी येऊन शेतीपूरक असलेला हा व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरेल.जलसंपदा मंत्री विखे हे दुग्धविकास मंत्री असताना दुधाला प्रतीलिटर अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला.पशुसंवर्धन विभागाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असताना भाकड व कमकुवत जनावरांसाठी वेगळे धोरण राबविले तर व गोहत्या थांबण्यास त्याचा चांगला हातभार लागेल.दुग्ध व्यवसायातील तंत्रज्ञानाचा वापर,पशुधनाची गुणवत्ता वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने गोदावरी दूध संघाने सुरू केलेल्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केरताना अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली व्हेटर्नरी मेडिकल प्रयोगशाळा लवकरच कार्यवाही होणार असून त्यासाठी सुमारे 60 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन चे अतिरिक्त आयुक्त डाॅ.शितलकुमार मुकणे यांनी सांगितले की,”गाईंच्या गर्भावस्थेतील काही अनुवंशिक विकाराबरोबरच इतर विकार समजण्यास तसेच कोणत्या विकारासाठी कोणती औषधी परिणामकारक ठरु शकतील याची अचूक माहिती जेनोमिक चाचणीच्या माध्यमातून समजणार आहे.जनावरांची जात,उत्पादन क्षमता,दूध देण्याची क्षमता,रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याबरोबरच उच्च गुणवत्तेच्या जनावरांची निवड करणे व जातीवंत पैदास करण्यासाठी उत्कृष्ठ वंशावळीचे व अनुवंशीक दोष नसलेले नर (बैल / रेडे) निवडण्यासाठीही या चाचणीचा उपयोग होणार आहे.विशेषतः दुग्ध व्यवसायामध्ये उच्च उत्पादनक्षम जनावरांची निवड करण्यासाठी दोन्ही या चाचण्या उपयुक्त ठरत आहेत.यांनी जनावरांमधील अनुवंशिक रोग व त्या रोगाची क्षमता ओळखता येणार असून भविष्यात जनावरांना काही विशिष्ट आजार होणार असतील तर तेही या चाचणीमधून समजणार आहे.
यावेळी प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे.त्यावेळी ते म्हणाले की,”ब्रीड कंपोझिशन या चाचणीतून जनावरांच्या जनुकीय (डीएनए) तपासणीद्वारे त्यांच्या जातींचे प्रमाण ओळखता येणार असून प्राण्यांच्या शरीरातील डीएनएचे विश्लेशन करुन त्या प्राण्यामध्ये कोणकोणत्या जातीचा किती टक्के सहभाग आहे याचे देखील संशोधन करता येणार आहे.याशिवाय संकरीत गाईंमधील देशी व विदेशी रक्तांचे टक्केवारीचे प्रमाण तसेच कोणती गाय पैदाशीसाठी योग्य आहे या चाचणीमधून समजणार आहे.अर्थात जनावरांना होणाऱ्या वर्तमानातील व त्यासोबतच भविष्यातील आजारांची माहिती या चाचणीद्वारे कळणार असल्याने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील ही मोठी क्रांती ठरणार आहे.दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना दूध उत्पादन वाढीसाठी देखील या चाचणीचा चांगला लाभ होणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेने संघ कार्यस्थळापरील पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये संयुक्तिकरित्या सुरु केलेल्या या चाचण्यांचा पशुपालकांनी व दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवहनही श्री परजणे यांनी शेवटी केले आहे.
याप्रसंगी डॉ.सुनील तुंबारे व डॉ सचिन जोशी यांनीही दूध उत्पादकांना मार्गदर्शन केले आहे.या कार्यक्रमात संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करण्याऱ्या व सर्वाधिक दर देणाऱ्या सहकारी दूध संस्था,संकलन केंद्रे,नाश दूध नसणाऱ्या दूध संस्था,संघाकडे सार्वधिक दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक,यांच्यासह वर्षभरात संघाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कृत्रिमरेतनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या कृत्रिमरेतनधारकांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तर संघाच्या स्थापनेपासून दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना किटल्यांचे वाटप करण्यात आले.संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले आहे.



