जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

कोपरगाव शहरात…या पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात राष्ट्रवादीचा २३ वा वर्धापन दिन आज सकाळी १०.१० वाजता तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी व शहराध्यक्ष सुनील गंगूले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मूळ इटालियन मुद्द्यावरून मतभेद व्यक्त होऊन स्वतंत्र पक्ष शरद पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १० जून १९९९रोजी स्थापन केला होता.आज तो भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे.

शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.आज राज्यात महाआघाडीत हा पक्ष महत्वाची भूमिका निभावत आहे.त्यांचा आज २३ वा वर्धापन दिन कोपरगावसह राज्यात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,वाल्मिक लहिरे,संदीप कपिले,कार्तिक सरदार,शुभम लासुरे,गटनेते विरेंन बोरावके,माजी नगर सेवक मंदार पहाडे,वर्षा गंगूले,प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,कृष्णा आढाव,मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,रेखा जगताप,उषा उदावंत,कारखाना संचालक श्रावण आसने,गोरक्षनाथ जामदार,सचिन चांदगुडे,विठ्ठलराव आसने,अनिल महाले,छगन राव देवकर,वाल्मिक नवले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी प्राचार्य डॉ.अंबादास वंडांगळे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन माधवराव खिलारी,सुनील गंगूले यांनी मार्गदर्शन केले आहे.सूत्रसंचलन माजी गटनेते विरेंन बोरावके यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंदार पहाडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close