जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

आशा गट प्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

धानोरी -(प्रतिनिधी)

 
  आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी ऍड.सुधिर टोकेकर तर कार्यकारिणीवर कॉ.सुरेश पानसरे व कॉ.ज्योती पंडुरे यांची निवड आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

सदर प्रसंगी राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणला आहे तो संविधान व अभिव्यक्ती विरोधी आहे सदर कायदा ताबडतोब मागे घ्यावा,आशा व गट प्रवर्तकांना पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा दयावा आदी मागण्या केल्या आहेत.

    आयटकसह केंद्रीय कामगार संघटनांनी कामगार विरोधी श्रम संहिता कायद्या विरोधात येत्या २० मे रोजी संप पुकारला आहे.या पार्श्वभूमीवर गोंदिया येथे आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी ही निवड जाहीर करणेत आली आहे.सदर अधिवेशनात अहील्यानगर जिल्ह्यातून कॉ.जयश्री गुरव कॉ.मिना बनकर यांची उपस्थिती होती.

   गोंदिया येथील अधिवेशनात कार्यकारिणी यादी पुढील प्रमाणे आहे.त्यात अध्यक्षपदी कॉ.राजु देसले (नासिक ) उपाध्यक्षपदी ऍड.कॉ.सुधिर टोकेकर (अहिल्यानगर ) तर राज्य कार्यकारीनीवर कॉ.सुरेश पानसरे (अहिल्यानगर ) कॉ.सुवर्णा थोरात (अहिल्यानगर) कॉ.ज्योती विलास पंडुरे (अहिल्यानगर) आदींचा समावेश आहे.

   सदर प्रसंगी राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणला आहे तो संविधान व अभिव्यक्ती विरोधी आहे सदर कायदा ताबडतोब मागे घ्यावा,आशा व गट प्रवर्तकांना पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा दयावा,महापुरुषांची बदनामी करणाऱ्या अपप्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी,महीला अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण राबवावे,आशा गट प्रवर्तवांना सहा महीन्याची पगारी रजा द्यावी आदी मागण्या केल्या आहेत.सदर प्रसंगी कॉ.मुगाजी बुरुड यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close