जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महावितरण विभाग

शहराच्या…या भागासाठीस्वतंत्र वीज वाहिनी टाका सूचना

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरीकांना अनियमितपणे वीजपुरवठा होत असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.त्यासाठी कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागासाठी कोपरगाव उपकेंद्रातून स्वतंत्र वीज वाहिनी टाका अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्रातून केली आहे.

आ.आशुतोष काळे.

कोपरगाव शहरातील माधवनगर,सानपवस्ती,देवकर प्लॉट आणि गवारे वस्तीमधील नागरिकांना येणाऱ्या अडचणींची गंभीर दखल घेवून आ.काळे यांनी या हद्दवाढ झालेल्या भागाला शहराच्या सबस्टेशनला निरंतर वीज योजने अंतर्गत जोडण्यासाठी स्वतंत्र फिडर अर्थात वीज वाहिनी टाकण्याच्या सूचना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.त्याबाबत या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,” कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला असून कोपरगाव शहराच्या सभोवताली अनेक नवीन उपनगरे वसली आहेत.कोपरगाव शहराच्या या उपनगरांपैकी माधवनगर,सानपवस्ती,देवकर प्लॉट आणि गवारे वस्ती या परिसराचा समावेश जरी नगरपालिकेत झाला असला तरी या भागाला अद्यापही ग्रामीण भागातून वीज पुरवठा केला जात आहे.त्यामुळे अनेक वेळा या उपनगरातील नागरीकांना अनियमितपणे वीजपुरवठा होत असतो.वर्तमानात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून वीज गेल्यानंतर उष्णतेचा त्रास अधिकच वाढतो.अशावेळी शेजारच्या उपनगरात किंवा कोपरगाव शहरात वीज असते परंतु आम्हाला मात्र अंधारात राहावे लागते त्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर होवून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ झालेल्या माधवनगर, सानपवस्ती,देवकर प्लॉट आणि गवारे वस्तीमधील नागरिकांना नगरपालिकेच्या इतर सर्व नागरी सुविधा मिळत आहेत.मात्र वीज वितरणाची व्यवस्था अद्यापही ग्रामीण फिडरवरच अवलंबून असल्याने या भागातील रहिवाशांना अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close