गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात तरुणीस मारहाण,पाच जणांविरुद्ध गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी कु.मयुरी शंकर चव्हाण (वय-१८) हि आपल्या अंगणात माती जे.सी.बी.यंत्राच्या साहाय्याने सपाट करत असताना त्याच गावातील आरोपी प्रवीण शिवाजी चव्हाण,कैलास नारायण चव्हाण,शोभा नारायण चव्हाण,माधुरी प्रवीण चव्हाण,मंगल शिवाजी चव्हाण आदींनी फिर्यादिस धक्काबुक्की करून मारण्यास सुरुवात केली त्या वेळी फिर्यादीची आई सविता शंकर चव्हाण हि भांडण सोडण्यास मध्ये पडली असता तिलाही वरील आरोपीनी मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
माती पांगविण्याच्या किरकोळ घटनेत आरोपी प्रवीण चव्हाण माधुरी चव्हाण,मंगल चव्हाण आदींनी फिर्यादी मुलीस धक्काबुक्की करण्यास प्रारंभ केला होता.तेंव्हा फिर्यादीची आई सविता चव्हाण हि हे भांडण सोडविण्यास आली असता वरील तिघांनी तिला मारहाण केली आहे.हे भांडण पाहून फिर्यादी मुलीचा भाऊ हे भांडण ऐकून ते सोडण्यासाठी आला असता त्याची आरोपी चुलती मंगल शिवाजी चव्हाण हि त्याचे उजव्या हाताच्या दंडास चावली आहे.तर आरोपी भावजयी माधुरी चव्हाण हिने फिर्यादी मुलीचे केस ओढून खाली पाडून तिला बेदम मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलगी हि धोत्रे येथील रहिवासी असून आरोपीही त्याच गावातील आरोपी आहे.ते एकमेकांचे भाऊबंद असून त्यांच्यात घरातील अंगणात जे.सी.बी.च्या सहाय्याने टाकलेली माती अंगणात पांगविण्याच्या किरकोळ कारणावरून दि.०८ जून रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास भांडण झाले आहे.
या घटनेत आरोपी प्रवीण चव्हाण माधुरी चव्हाण,मंगल चव्हाण आदींनी फिर्यादी मुलीस धक्काबुक्की करण्यास प्रारंभ केला होता.तेंव्हा फिर्यादीची आई सविता चव्हाण हि हे भांडण सोडविण्यास आली असता वरील तिघांनी तिला मारहाण केली आहे.हे भांडण पाहून फिर्यादी मुलीचा भाऊ हे भांडण ऐकून ते सोडण्यासाठी आला असता त्याची आरोपी चुलती मंगल शिवाजी चव्हाण हि त्याचे उजव्या हाताच्या दंडास चावली आहे.तर आरोपी भावजयी माधुरी चव्हाण हिने फिर्यादी मुलीचे केस ओढून खाली पाडून तिला बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान या भांडणात आरोपी कैलास चव्हाण चुलता बाजूस राहिले असते तर ते आश्चर्य होते.त्यांनीही हे भांडण सोडण्या ऐवजी या भांडणात उडी घेतली व त्यानीं फिर्यादिस तुमच्याकडे आता बघतोच असा दम देऊन शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.या प्रकरणी आरोपी विरुद्ध फिर्यादी तरुणी मयुरी चव्हाण हिने या प्रकरणी फिर्यादीने उपचार घेतल्यावर नुकताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२११/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.