जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शहरातील…या पक्षाची कोअर कमिटी जाहीर

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली असून त्यात सुनील गंगुले,दिनार कुदळे,मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,विरेन बोरावके,बाळासाहेब रुईकर,रमेश गवळी,इम्तियाज अत्तार,शैलेश साबळे,विजय त्रिभुवन,सचिन गवारे,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी आदी चौदा जणांचा समावेश आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

छायाचित्रात राष्ट्रवादीची नूतन कार्यकारिणी दिसत आहे.
  कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटास नगराध्यक्ष पद मिळालं नाहीच पण त्यांचे नगरसेवक 07 वरून 11 वर गेले आहे.मत तरीही त्यांना नगराध्यक्ष पद मिळण्यास आलेले अपयश जिव्हारी लागले असल्याची शक्यता आहे.परिणामी यांनी निवडणुकीनंतर सर्व कार्यकारिणी बरखास्त केली होती.मात्र आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात त्याची भरपाई होण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा हाती पायताण घेतले असल्याचे दिसून येत आहे.

   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटास नगराध्यक्ष पद मिळालं नाहीच पण त्यांचे नगरसेवक 07 वरून 11 वर गेले आहे.मत तरीही त्यांना नगराध्यक्ष पद मिळण्यास आलेले अपयश जिव्हारी लागले असल्याची शक्यता आहे.परिणामी यांनी निवडणुकीनंतर सर्व कार्यकारिणी बरखास्त केली होती.मात्र आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात त्याची भरपाई होण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा हाती पायताण घेतले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या कोअर कमिटीची यांनी घोषणा केली असल्याचे दिसून येत आहे.
  कोअर कमिटीमध्ये शहरातील अनुभवी पदाधिकारी,ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.या माध्यमातून पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या कोअर कमिटीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असून शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.

  नूतन कार्यकारिणीचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी सर्व कोअर कमिटीच्या सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.आपल्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून समन्वयाने काम करावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close