जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी नूतन बाबासाहेब सावंत (वय-१६)हिने आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मुले-मुली आपले जीवन संपवण्याचा विचार का करतात ? त्यांना मरणाची भीती वाटत नाही का ? इतके सहज हे कसे घडते ? मुलांशी वागायचे तरी कसे ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविकच आहे.नुसते प्रश्न पडून उपयोग नाही,तर त्याबाबतची आपली समज वाढवली पाहिजे,हा प्रश्न समजून घेतला पाहिजे व त्या बाबतीत ठोस उपाय योजना करायला हवी.आत्महत्या करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही.ती मनाची स्थिती आहे.ही स्थिती निर्माण होण्यासाठी परिस्थिती,घटना,व्यक्ती,संस्था जबाबदार असतात.आत्महत्या हा वैयक्तिक विषय नसून सामाजिक विषय आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे.

वर्तमानात आत्महत्या हा वैयक्तिक विषय नसून सामाजिक विषय आहे.यासाठी सरकार,प्रशासन,समाज आणि कुटुंब असे एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत.मात्र अशा घटना वारंवार होत असून हा चिंतेचा विषय बनला आहे अशीच घटना सोमवार दि. ०८ मे रोजी सकाळी ०८.५० पूर्वी कधीतरी कोपरगाव तालुक्यात आंचलगाव शिवारात घडली आहे.सदर म उलगी दहावी उत्तीर्ण झाली होती अशी माहिती आमच्या प्रतींनिधीस प्राप्त झाली आहे.

सदर घटना घरच्या नातेवाईकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३१/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close