कृषी विभाग
तालुक्यातील खरीप हंगाम बैठक,केवळ एक फार्स,कोपरगावातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आयोजित केलेली बैठक आज केवळ सोपस्कार करून आटोपती घ्यावी लागली असल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.त्यामुळे शासकीय पातळीवर हा सोपस्कार बंद केलेला योग्य अशी भावना शेतकऱ्यांत उमटली आहे.
“शेतकऱ्यांना मागील खरीप पिकाचे नियोजन बैठक आयोजित केली त्यावेळी त्याच्या काय-काय उपाययोजना केल्या याचे इतिवृत्त वाचून दाखविण्याची मागणी केली.व आगामी खरीप नियोजन काय केले जाणार आहे ? यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.मागील वर्षी ऊस पीकाखालील क्षेत्र वाढले मात्र उत्पन्न घटले त्यावर कृषी विभागाने काय उपाय सुचवले याचा जाबसाल केला आहे.शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान व कृषी मालाला अनुदान देण्याऐवजी उत्पादित मालाला कृषी विभागाने रास्त भाव देण्यासाठी काय योजना आहे”-राजेंद्र खिलारी,कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस.
कोपरगाव पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक २०२३-२४ आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी हि धक्कादायक बाब उघड झाली आहे.त्यावेळी सदर शेतकरी आमच्या प्रतिनिधींशी बोलत होते.त्या वेळी आ.काळे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,संगमनेरचे कृषी अधिकारी गोविंद कुलाळ,नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी,शोभा गोरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,अनिल कदम,शिवाजी घुले,शंकरराव चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण,खंडू फेफाळे,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,जिनिंग प्रेसिंगचे संचालक संजय संवत्सरकर,भास्करराव सुराळे,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,मुर्शतपुरचे सरपंच अनिल दवंगे,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,राष्ट्रवादीचे राजेंद्र खिलारी,तुषार विध्वंस,गणेश घुमरे,गणेश घाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर,कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष सागर कवडे,सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,सर्व मंडल कृषी अधिकारी, तलाठी,मंडलाधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक,शेतकरी मित्र,आत्मा कमिटीचे सदस्य,तालुका शेतकरी समन्वयक,कृषी विमा कंपनी प्रतिनिधी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी संजय काळे यांनी,”कोपरगाव तालुका पर्जन्यछायेचा असल्याने या भागात सप्टेंबर पर्यंत पाऊस पडत नाही मग या काळात कोणती पिके घेतली पाहिजे असा सवाल केला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी का मिळत नाही ? असा सवाल उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केला आहे.त्यावर त्यांनी एकाने उत्तर दिले नाही हे विशेष !
दरम्यान त्यांनी पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की,”खरीप पिकांची आकडेवारी वाचून दाखवत व तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना चारा पिके का दाखवले जात नाही असा रोकडा सवाल केला आहे.व मनोज सोनवणे या कृषी अधिकांऱ्यास मृद तापसणीसाठी काय उपाय योजना केल्या आहेत यावर लक्षवेध केला आहे.त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.सदर प्रकरणी त्यांनी तालुक्यात कोपरगाव टाकळी फाटा,सुरेगाव,पढेगाव,जेऊर कुंभारी,पोहेगाव आदी ठिकाणी पर्जन्य मापक यंत्रे आहेत मात्र त्यावर पाऊस नीट मोजला जात नाही.व नजीकच्या गावातील पाउस नेमका किती हे समजले जात नाही यावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे व त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत पर्जन्य मापक बसवले जावे अशी मागणी केली आहे.मात्र या महत्वपूर्ण प्रश्नावर अधिकांऱ्यानी अपेक्षे प्रमाणे आपले मौन सोडले नाही.
सदर प्रसंगी तुषार विध्वंस यांनी यावेळी कृषि आधीकाऱ्यांना लेट खरिप व खरीपाचे प्रकार किती या विषयी माहिती विचारली होती.या शिवाय त्यांनी खरीपास गोदावरी कालव्यांचे पाणी मिळणार काय ? असा निरुत्तर करणारा सवाल विचारला होता.गोदावरी कालवे बारमाही असताना खरीप पिकांना दोन वर्षापासून पाणी का मिळत नाही ? या बेदिलीमुळे खरीप तालुक्यात घटले असल्याचा आरोप केला आहे.शेतकऱ्यांना विविध योजना दिल्या जातात पण त्यांना विविध कागद पत्रांच्या नावाखाली हेलपाटे मारून निम्मे अनुदान संपून टाकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.व आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधार,बँकेचे खाते क्रमांक,फोटो,गट क्रमांक आदिंचा डाटा करून संग्रही करण्याची मागणी करुन प्रत्येक वेळी तो घेण्याची आवश्यकता नाही.नुकसान भरपाई तथा कोणत्याही योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या जमा करण्याची मागणी केली आहे.वारंवार शेतकऱ्यास उपकृत करण्याचा अश्लाघ्य प्रकार करू नका अशी मागणी केली आहे.मात्र यावर आ.काळेंसह कोणीही उपस्थित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही व मौन पाळणे पसंत केले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र खिलारी यांनी,”शेतकऱ्यांना मागील खरीप पिकाचे नियोजन बैठक आयोजित केली त्यावेळी त्याच्या काय-काय उपाययोजना केल्या याचे इतिवृत्त वाचून दाखविण्याची मागणी केली.व आगामी खरीप नियोजन काय केले जाणार आहे ? यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.मागील वर्षी ऊस पीकाखालील क्षेत्र वाढले मात्र उत्पन्न घटले त्यावर कृषी विभागाने काय उपाय सुचवले याचा जाबसाल केला आहे.शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान व कृषी मालाला अनुदान देण्याऐवजी उत्पादित मालाला कृषी विभागाने रास्त भाव देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा अधिकाऱ्यांना निरुत्तर करणारा सवाल केला आहे.”आम्हाला कर्जमाफी नको व अनुदानाचे भीक नको तर रास्त भाव द्या” अशी मागणी केली आहे.चाळीस हजारांचे अनुदान देण्यासाठी चाळीस हेलपाटे मारण्याची शिक्षा दिली जाते.त्यामुळे त्या हेलपाट्यात त्याचे अनुदान जिरुन जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.कोपरगाव तालुक्यात बियाणे,खते,आणि औषधे आदींच्या किमती आकाशाला भिडल्या असतांना कृषी विभागाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय कारवाई केली असा तिखट सवाल शेवटी केला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र खिलारी यांनी घरचा आहेर देत,”कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना बारा तास स्वच्छ ऊर्जेची वीज उपलब्ध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यात असलेली शेती महामंडळाची जमीन लिजवर घेऊन त्यावर सौर पॅनल बसवून वीज उपलब्ध करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.मात्र या सर्व प्रश्नावर अधिकारी व उपस्थित नेते मौन पाळणे पसंत केले आहे.
त्यामुळे खरीप आढावा बैठक हि केवळ फार्स ठरत असल्याचा आरोप केला असून तो सार्थ असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली आहे.त्यामुळे तालुक्यात या विभागाच्या दरवर्षी संपन्न होणाऱ्या बैठकीच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.