महसूल विभाग
…या गावात शेतशिवार रस्त्याचा श्वास मोकळा,शेतकऱ्यांत समाधान

न्युजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
गावाच्या हद्दीतील बंद होत असलेले शिवार रस्ते (गाडी मार्ग) व वहिवाटीने पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा निर्णय कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी घेतला आहे.त्यासाठी वेळ पडली तर पोलिस बळाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यामुळे चांदेकासारे भावकीचा गट क्रं.११४/८ मधील रस्त्यांचा मार्ग जागेवर मोकळा केला आहे.त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाणंद रस्त्यांना ग्रामीण भाषेत शिवार रस्तेही म्हटले जाते.या रस्त्यांसह पायवाट,ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) रस्ते खुले करण्यासाठी गावचे सरपंच,तलाठी,तहसीलदार, बी.डी.ओ.एकत्रितपणे बैठक घेतील.तरी मार्ग मोकळा न झाल्यास पोलिसांच्या सहकार्याने हा मार्ग खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.त्याची अंमलबजावणी कोपरगाव तालुक्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या पूर्वी तहसीलदार महेश सावंत यांनी यावर मोठे काम केले असून एक पुस्तक प्रकाशित केले आहे.
देशभरात कुटुंबासमवेत शेतीचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होत आहे.परिणामी क्षेत्र कमी होत चालले असून,शेतातून जाणारे मार्गही बंद करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वहिवाट रस्ते,ग्रामीण रस्ते,हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करण्याकरिता अनेक दिवसांपासून प्रकरण प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत.या प्रकरणांचे स्थळ निरीक्षण करणे,मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे.

त्यातून रस्त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.या संदर्भात योग्य कार्यवाही करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी पूर्वीच एक परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार,गावचे तलाठी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरीक्षक यांना कायदेशीर बाबींच्या सूचना दिल्या आहेत.
गावातील पायवाटा या गावच्या नकाशातून तुटक रेषेने दर्शविलेल्या आहेत.या पायवाटांची रुंदी सव्वाआठ (८.२५ फूट) असायला हवी.तसेच ग्रामीण गाडी मार्ग हा साडेसोळा ते २१ फुटांपर्यंत रुंद करण्याचे आदेश दिले आहेत.गावातील तलाठी व सरपंच यांनी प्रथमत: गावचे शिवार रस्ते व पायवाट यांचा शोध घ्यावा.त्यानंतर भोगवटधारकांसमवेत बैठक घेऊन त्यांची समजूत काढावी.तरीही त्यांनी ‘वाट अडविल्यास’ पोलिस बळाचा वापर करण्याची स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.तरीही मार्ग मोकळा झाला नाही तर कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
या संदर्भातील कालबद्ध कार्यक्रमच त्यांनी आखून दिला आहे.त्यामुळे पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा होण्यास मदत झाली असून आगामी काळात होणार आहे.दरम्यान यासाठी वेळ पडली तर पोलिस बळाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.चांदेकासरे येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या भावकीचे शेतकरी अडवणुकची भूमिका घेत होते.त्यांनी याबाबत तहसीलदार महेश सावंत यांचेकडे याबाबत दाद मागितली होती.त्याबाबत त्यांनी नुकतीच सुनावणी घेऊन त्याबाबत स्थळ पाहणी करून त्या दोन्ही गटातील शेतकऱ्यांना गट क्रं.११४/८ मधील रस्त्याबाबत कायदेशीर मार्गाने रस्ता देण्याची विनंती केली होती.त्यांनी ती समजावून घेतल्याने त्यात जागेवरच मार्ग निघाला आहे.त्याबाबत पोलिस बाळाचा वापर करण्याची त्यांना गरज आली नाही त्याबाबत तहसीलदार महेश सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी अशी सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे.
पाणंद रस्त्यांना ग्रामीण भाषेत शिवार रस्तेही म्हटले जाते.या रस्त्यांसह पायवाट,ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) रस्ते खुले करण्यासाठी गावचे सरपंच,तलाठी,तहसीलदार, बी.डी.ओ.एकत्रितपणे बैठक घेतील.तरी मार्ग मोकळा न झाल्यास पोलिसांच्या सहकार्याने हा मार्ग खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.त्याची अंमलबजावणी कोपरगाव तालुक्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.