गुन्हे विषयक
…या नदीकाठी वाळूचोरांची दिवाळी,दीडशे डंपर सुरू !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्याचा संप सुरू असल्याची संधी साधत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव आणि परिसरात गोदावरी नदीपात्रातून वारेमाप वाळूउपसा सुरू असल्याचे दिसून येत असून महसूल विभाग डोळ्यावर कातडे ओढून बसले असल्याचे दुर्दैवाने दिसून येत आहे.त्यामुळे नदी काठच्या ग्रामस्थानी चिंता व्यक्त केली आहे.याबाबत महसूल आणि पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाळू चोऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची मागणी केली आहे.

दरम्यान सुरेगाव आणि परिसरात जवळपास फरांद्याच्या सहाय्याने दीडशे डंपर आणि ट्रॅक्टर सुरू असल्याची माहिती आहे.याबाबत ग्रामस्थांनी आपली सजगता दाखवत वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री,खासदार,आमदार आदींना याबाबत लक्ष वेधण्यासाठी इमेल केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता तरी महसूल अधिकारी आणि कर्मचारी अंग झटकून काम करणार का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळूचोरी आणि वाढलेला भ्रष्टाचार याने तालुका पोखरून निघाला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.माजी आ.अशोक काळे यांनी मागील वर्षी मंजूर करून आणलेला धारणगाव-कुंभारी पुलाजवळ कोणताही अदमास न पाहता त्याला वाळूचोरांनी सुरुंग लावला असल्याचे उघड झाले होते.त्यामुळे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच संतप्त कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी वाळूचोरी थांबली नाही तर अवैध वाळूचोरांच्या गाड्या आपण जाळून टाकू व त्यांना गोळ्या घालू असा रोखठोक इशारा यांनी दिला असल्याचे घटनेला बरोबर वर्ष पूर्ण झाले असताना कोपरगाव तालुक्यात वाळूचोरांनी आणि महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कोणताही बोध घेतला असल्याचे दिसून येत नाही.आगामी काळात बारा वर्षांनी येणारी सिंहस्थ पर्वणी येत असताना हा नंगानाच सुरू आहे.तरीही गोदावरी नदीला उजाड बोडके करण्याचे काम या मंडळीकडून मनोभावे सुरूच असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात तर महसूल विभागासह राज्यातील ‘ड ‘ वर्ग कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारकडून मंजुर करणासाठी संप पुकारला आहे.याची संधी साधत सुरेगाव आणि परिसरात वाळूचोरांनी आपल्या लीला जोरात सुरू केल्या असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांना महसूल आणि पोलिसांचे भय आहे की नाही ? अशी शंका निर्माण झाली आहे.याबाबत महसूल विभागाने डोळ्यावर कातडे ओढून घेतले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वाळू उपसा प्रतिबंधक समिती ही कारवाई करणार की अन्य कोणी अधिकारी ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे या उन्हाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आ.काळे हे आपल्या दंडाच्या बेटकुळ्या दाखवणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान सुरेगाव आणि परिसरात जवळपास फरांद्याच्या सहाय्याने दीडशे डंपर आणि ट्रॅक्टर सुरू असल्याची माहिती आहे.याबाबत ग्रामस्थांनी आपली सजगता दाखवत वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री,खासदार,आमदार आदींना याबाबत लक्ष वेधण्यासाठी इमेल केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता तरी महसूल अधिकारी आणि कर्मचारी अंग झटकून काम करणार का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे या कारवाईबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.



