जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जुगार खेळताना सात जणांना अटक,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे-धोत्रे रस्त्यावर हॉटेल राधिकाच्या मागे मोकळ्या जागेत काल सायंकाळी ९.५७ वाजेच्या सुमारास तिरट नावाचा जुगार खेळताना सात आरोपी आढळून आले असताना त्या ठिकाणी तालुका पोलिसांनी धाड टाकली असता त्यात कैलास नारायण चव्हाण,पवन शरद माळवदे यासह सात जणांना अटक केली असून त्यांच्या कडून १० हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे जुगारी नागरिकांत खळबळ उडाली आहे.

धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत पोलीस अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसंवेत भोजडे-धोत्रे रस्त्यावरील हॉटेल राधिकाच्यामागे मोकळ्या जागेत धाड टाकली असता सदर ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळताना सात आरोपी आढळले आहे.त्यात कैलास नारायण चव्हाण (वय-३५),पवन शरद माळवदे (वय-२२),ज्ञानेश्वर बाळासाहेब जाधव,दीपक करू भाटे (वय-३०),नवनाथ कारभारी मोकाटे (वय-३८),विशाल विजय माळवदे (वय-३२),सर्व रा.धोत्रे,प्रकाश विठ्ठल नवले (वय-४०) रा.खोपडी आदीं सात जणांना अटक केलेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात पाऊस जास्त झाल्याने अनेकांना शेतीचे कामे नाहीत.त्यामुळे रिकामा वेळ नागरिकांकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.त्यात काही जुगारी आपल्या घरून काही रक्कम हडप करून त्याचा चांगला विनियोग सोडून त्याचा वापर जुगारासाठी करताना दिसून येत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास काही नागरिक धोत्रे शिवारात अवैध रित्या जुगारखेळत असल्याची गुप्त बातमी कोपरगाव तालुका पोलिसानी मिळाली होती.

त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत आपल्या सहकाऱ्यांसंवेत भोजडे-धोत्रे रस्त्यावरील हॉटेल राधिकाच्यामागे मोकळ्या जागेत धाड टाकली असता त्यात त्यांना तथ्य आढळले आहे.त्यांनी सदर ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळताना सात आरोपी आढळले आहे.त्यात कैलास नारायण चव्हाण (वय-३५),पवन शरद माळवदे (वय-२२),ज्ञानेश्वर बाळासाहेब जाधव,दीपक करू भाटे (वय-३०),नवनाथ कारभारी मोकाटे (वय-३८),विशाल विजय माळवदे (वय-३२),सर्व रा.धोत्रे,प्रकाश विठ्ठल नवले (वय-४०) रा.खोपडी आदीं सात जणांना अटक केलेली आहे.त्यांच्याकडून रोख रक्कम १० हजार ४१० रुपये जप्त केले आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,पो.हे.कॉ.वाखुरे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.जयदीप दामोदर गवारे (वय-३६) कोपरगाव यांनी वरील इसमा विरुद्ध गुन्हा क्रं.३७०/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.वाखुरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close