जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कंटेनर-टेंपो अपघात,एक ठार एक जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड राज्य मार्गावर येसगाव शिवारात काल सायंकाळी ५.३० कंटेनर-टेंपो यांची जोराची धडक झाली असून यात टेंपो चालक काशिनाथ लक्ष्मण गोठे हा इसम जागीच ठार झाला आहे तर विश्वास फिलिप्स वाघ रा.धुळे हा जखमी झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यातील कंटेनर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.

संकल्पित छायाचित्र.

दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत शिवारात सातळकर वस्तीसमोर घडली आहे.यात कंटेनर चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रं.एन.एल.०१ ए.बी.९०८२) घेऊन मनमाडच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दूर्लक्ष करून समोरून येणाऱ्या टेंपोस (क्रं.एम.एच.१२ पी.क्यु.३८७६) जोराची धडक दिली आहे.त्यात टेंपो चालक काशिनाथ गोठे हा जागीच ठार झाला आहे.तर त्याचा क्लीनर विश्वास वाघ हा गंभीर जखमी झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,नगर-मनमाड हा राज्य मार्ग वर्तमानात अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर खड्डे जास्त आणि रस्ता कमी अशी स्थिती ओढवली आहे.त्यामुळे नागरिकांचे हकनाक बळी जाताना दिसत आहे.यात राजकीय धेंडांना काही देणे घेणे दिसत नाही.अशीच घटना रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत शिवारात सातळकर वस्तीसमोर घडली आहे.यात कंटेनर चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रं.एन.एल.०१ ए.बी.९०८२) घेऊन मनमाडच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दूर्लक्ष करून समोरून येणाऱ्या टेंपोस (क्रं.एम.एच.१२ पी.क्यु.३८७६) जोराची धडक दिली आहे.त्यात टेंपो चालक काशिनाथ गोठे हा जागीच ठार झाला आहे.तर त्याचा क्लीनर विश्वास वाघ हा गंभीर जखमी झाला आहे.घटना घडल्यावर नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील जखमींना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकांऱ्यानी त्यांस मृत घोषित केले आहे.घटनास्थळी जखमींना मदत न करताच आरोपी कंटेनर चालक फरार झाला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहायक फौजदार एम.ए.आंधळे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रमोद बाबासाहेब मदने (वय-२८) रा.जुनी सांगवी भाजी मंडी समोर पुणे यांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६२/२०२२ दाखल केला होता.मात्र फिर्यादीने गुन्हा दखल केल्याने या प्रकरणी पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.३७१/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १३४(अ) (ब)१८४,१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close