शैक्षणिक
..या विद्यार्थ्यांची सशस्त्र सीमाबलात निवड !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे दोन छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बलाच्या तुकडीमध्ये कॉन्स्टेबल (जी.डी.) या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी येथे दिली आहे.

सशस्त्र सीमा बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. जे भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर रक्षण करण्यासाठी तैनात आहे. SSB ची स्थापना १९६३मध्ये झाली.सशस्त्र सीमा बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे,जे भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर रक्षण करण्यासाठी तैनात आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ.नितीन शिंदे म्हणाले की,”महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांची गृह मंत्रालयाच्या (भारत सरकार) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत क्रमशः सशस्त्र सीमा बल व इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (जी.डी.) या पदावर गुणवत्तेच्या आधारे निवड झाली आहे.या निवडीसाठी दोन्ही छात्रसैनिक गेल्या अनेक महिन्यांपासून परिश्रम घेत होते.
दरम्यान ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांचे या निवडीबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे व सचिव ऍड संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे आदींनी अभिनंदन केले आहे.या दोन्ही छात्र सैनिकांना छात्रसेना प्रमुख कॅप्टन डॉ.नितीन शिंदे व लेफ्टनंट प्रा. वर्षा आहेर यांचे मार्गदर्शन लाभले होते.