जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील…या ग्रामपंचायतीत २६ लाखाचा अपहार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये काम करणारे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर,धोडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका दत्तू दरेकर व ठेकेदार बाबासाहेब रामभाऊ शिंदे या तिघांनी संगनमताने २०२० ते २०२२ या काळात कुठल्याही प्रकारचे गावात विकासाचे काम न करता धनादेशाद्वारे २५ लाख ९५ हजार ९५० रुपयाचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन भाऊराव वाघमोडे (वय-५३) यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात नुकताच दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बऱ्याच ठीकाणी महिला सरपंच म्हणून असतात पण कारभार मात्र त्यांचे पतीच पहात असतात.त्याचा हा परिणाम असतो मात्र येथे नेमका कारभार कोणी पाहिला आणि मलई कोणी खाल्ली हे लवकरच स्पष्ट होणार आहे.तालुक्यात आणखी किती ठिकाणी हा घोळ आहे याचा तपास करण्याची गरज आहे.जवळके या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी असाच काही लाखांचा घोळ झाला होता.मात्र वर्तमानात प्रशासन राज असल्याने हा तपास कसा आणि कोण करणार हे कळणार आहे.हि ग्रामपंचायत कोल्हे गटाच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”धोंडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी भाऊसाहेब मगर हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.सदर इसम हे सतत आपल्या कामावर गैरहजर असल्याने नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या.आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भेट देऊन विस्तार अधिकारी वाघमोडे यांनी त्यास नोटीस बजावली होती.त्यास नोटीस बजावूनही त्याने आपल्या ग्रामपंचायतीचे दप्तर पंचायत समितीत जमा केले नव्हते.दि. ६ मे २०२२ रोजी नवीन ग्रामसेवकांना पदभार द्यावा असा आदेश बाजवले होते.तरीही संबंधित मुजोर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने आपला पदभार नवीन ग्रामसेवकाकडॆ सोपवला नव्हता.

दरम्यान सदर ठिकाणी कोपरगाव पंचायतीचे गटविकास अधिकारी यांनी पंच समक्ष तपासणी केली असता १४ व्या वित्त आयोगातून असलेल्या बँक खात्यातून १४ आक्टोंबर २०२१ ते ०४ फेब्रुवारी २०२२ या कालखंडात १५ लाख ३५ हजार ७५० इतका खर्च केला असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्यासंबंधी कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केली नव्हती.म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय वाढला होता.त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपले चौकशी पथक पाठवून कामकाजाचे परिक्षण असता हा गफला उघड झाला आहे.

यात संशयित ग्रामसेवकाने १५ वित्त खात्यातून १५ फेब्रुवारी ते ०६ एप्रिल २२ या काळात १० लाख ६० हजार २०० रुपये इतका खर्च केला होता.पण कोणत्या कामावर झाला हे निदर्शनास येत येत नव्हते.दरम्यान धोंडेवाडी ग्रामपंचायतीत कोणतेही काम केल्याचे आढळून आले नव्हते.
ग्रामसेवक शिवाजी मगर,सरपंच रेणुका दरेकर यांनी काम न करता जवळपास २५ लाख ९५ हजार ९५० इतकी मोठी रक्कम बँक खात्यातून बाबासाहेब शिंदे यांच्या नावाने वेळोवेळी धनादेशद्वारे काढली असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान याच ठिकाणी संगनमताने शासकीय रकमेचा आपल्या फायद्यासाठी अपहार केला अशी फिर्याद गट विस्ताराधिकारी बबन भाऊराव वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी धोंडेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर रा.संवत्सर.कोपरगाव धोंडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका दत्तू दरेकर व बाबासाहेब रामभाऊ शिंदे रा.शिर्डी या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद क्रं.०२७२ /२०२२ भा.द.वि.कलम ३४,४०९,४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या ग्रामसेवक महाशयांनी यापूर्वीही चार वेळा असा घोटाळा केला होता व त्यात हे बडतर्फ केले होते.तरीही या इसमाने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही हे विशेष!तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाने यापूर्वीच्या प्रकरणात दिलेली ढिलाई या प्रतापाला कारणीभूत मानली जात आहे.

दरम्यान या घटनेचा तपास शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करीत आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियंत्रण असताना हा घोटाळा झालाच कसा ? असा सवाल निर्माण झाला आहे.कोपरगाव तालुक्यात आणखी किती ग्रामपंचायतीत भाग घोळ आहे याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close