जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात विस्थापितांना दिलासा देणारा १४ कोटींचा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेली अकरा वर्ष विस्थापितांचा प्रश्न निवडणुकी पुरता तोंडी लावणाऱ्या नेत्यांना तोंडघशी पाडणारा प्रशासकीय निर्णय नुकताच हाती आला असून आ.आशुतोष काळे यांनी राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव आगाराच्या भोवती १४ कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलास प्रशासकीय मंजुरी मिळवली असल्याचे वृत शहर वासीयांना दिलासा देणारे ठरले आहे.

संकल्पित छायाचित्र

कोपरगाव बस स्थानकाच्या सभोवती व्यापारी संकुलाची अद्याप आर्थिक मंजुरीचा अध्यादेश आला नसला तरी तो आगामी निवडणूक समोर ठेऊन घेतला नसला पाहिजे अनेकांनी अशी अपॆक्षा व्यक्त केली आहे.आ.काळे यांनी यापूर्वी साठवण तलाव आणि पिण्याची वाढीव पाण्याची मंजुरी रस्ते आदींना वेग दिला आहे.त्यापाठोपाठ हा निर्णय अनेकांना दिलासा देणार देणारा ठरणार आहे.आता हा निर्णय आगामी नगरपरिषद निवडणूक पाहून तांत्रिक मंजुरी,तत्वतः मंजुरी,आर्थिक मंजुरी या जंजाळात न अडकला म्हणजे मिळवली.

कोपरगाव शहरातील नागरिकांचे दोन हजाराहून अधिक व्यापाऱ्यांचे अतिक्रमणे १० मार्च २०११ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी उध्वस्त केले होते.त्यावेळी अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते.अनेकांना कोपरगाव शहर सोडून जाण्यास भाग पाडले होते.तर अनेकांचे संसार मातीमोल झाले होते.अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धारणगाव रस्त्यावर रांगोळ्या काढून आपली राजकीय पोळी भाजली होती.मात्र कृती मात्र कोणीही केली नव्हती.त्यावर अनेकांनी विधान सभा निवडणुका लढवल्या होत्या.आधी याबाबत उध्वस्त व्यापाऱ्यांनी संघटना काढली होती.मात्र त्यांच्या मागण्यांकडे अनेकांनी काणा डोळा करण्यात समाधान मानले होते.कोपरगाव बस आगार मंजूर करताना या व्यापारी संकुलाची मोठी जागा आहे हे अनेकांच्या ध्यानात आणूनही त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात आला होता.

मात्र त्याला कोपरगावचे नूतन आमदार व श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे अपवाद ठरल्याचे दिसत आहे.अद्याप याबाबत आर्थिक मंजुरीचा अध्यादेश आला नसला तरी तो आगामी निवडणूक समोर ठेऊन घेतला नसला पाहिजे अनेकांनी अशी अपॆक्षा व्यक्त केली आहे.आ.काळे यांनी यापूर्वी साठवण तलाव आणि पिण्याची वाढीव पाण्याची मंजुरी,रस्ते आदींना वेग दिला आहे.त्यापाठोपाठ हा निर्णय अनेकांना दिलासा देणार देणारा ठरणार आहे.आता हा निर्णय आगामी नगरपरिषद निवडणूक पाहून तांत्रिक मंजुरी,तत्वतः मंजुरी,आर्थिक मंजुरी या शब्दच्छलात न अडकला म्हणजे मिळवली.

गत ०६ एप्रिल रोजी पंचायत समिती इमारत उदघाटन समारंभ प्रसंगी आ.आशुतोष काळे यांच्या प्रास्तविकात केलेल्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी आश्वासन दिले होते हे अनेकांच्या स्मरणात असेल.त्यानुसार हे पाऊल उचलले सल्याचा दावा आ.काळे समर्थकांनी केला आहे.त्याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,परिवहन मंत्री ना.अनिल परब,परिवहन राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close