जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत पंपाच्या चोरीचे गुन्हे सुरूच,कोपरगाव पोलिसांपुढे आव्हान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे विद्युत पंपाची चोरी करणारी टोळी कार्यरत असून अनेकांचे विद्युत पंप चोरी होत असताना देर्डे-कोऱ्हाळे येथे नुकतीच एक टोळी चोरी करताना रंगेहात पकडली असताना रवंदे शिवारात आणखी एक विद्युत पंपाची चोरी उघड झाली असून या प्रकरणी फिर्यादी साहेबराव शिवराम लामखडे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यात विद्युत पंप चोरी करणारी टोळी तालुका पोलिसांनी पकडली होती.त्यातील बहुतांशी आरोपी हे कोपरगाव शहरातील होते.त्यांच्यावर कारवाई झाली होती.तरीही देर्डे-कोऱ्हाळे आणि तालुक्यात या प्रकारच्या चोऱ्या मात्र थांबल्या नव्हत्या.आता रवंदे येथे विद्युत पंपाची चोरी झाल्याने या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान तालुका पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

दरम्यान दि.१४ जून रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास हिंगणी शिवारात देर्डे कोऱ्हाळे येथील फिर्यादी अनिल देशमुख यांची एक पाच अश्व शक्तीची विद्युत मोटार काही चोरटे चोरून नेत असल्याची खबर त्याना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस मच्छीन्द्र पवार यास पकडून ग्रामस्थांनी बेदम चोपले होते.व पोलिसांच्या हाती सोपवले होते.त्या बातम्यांची शाई अद्याप वाळली नसताना हा गुन्हा उघड झाला आहे.

अशातच रवंदे येथील शेतकरी साहेबराव लामखडे यांच्या गट क्रं.४४५ मधील विहिरीतील सुमारे ०४ हजार रुपये किमतीच्या पाच अश्वशक्तीच्या पानबुडी विद्युत पंपाच्या चोरीचा आणखी एका गुन्ह्याची नोंद क्रं.२२४/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे पोलीस ठाण्यात अज्ञातच चोरट्या विरुद्ध दाखल झाली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close