गुन्हे विषयक
स्टील,सिमेंटच्या नावावर ३.२४ लाखांची फसवणूक,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर व तालुक्यात सिमेंट,स्टील स्वस्तात देतो म्हणून फसवणूक झाल्याच्या बातम्या या आधी प्रसिद्ध झाल्या असून त्याबाबत अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता मात्र अशी एक घटना आता समोर आली असून याबाबत जेऊर कुंभारी येथील फिर्यादी डंपर चालक बाबासाहेब मच्छीन्द्र गोसावी (वय-४३) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकताच यड्रॉव फाटा इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील आरोपी शिवानंद दादू कुंभार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी व डंपर चालक बाबासाहेब गोसावी यांना यड्राव फाटा ता.ईचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील आरोपी शिवानंद कुंभार याने अशाच शब्द जंजाळात फसवून स्वस्तात स्टील व सिमेंट देतो म्हणून अनेक ठेकेदार,इंजिनिअर,नवीन शाळा इमारत बांधकाम करणारे शाळा संचालक आदींना आपल्या फाशात अडकवले आहे. सुरुवातीला पंचवीस-तीस टक्के सवलतीच्या दराचे आमिष दाखवले व ते पाळले मात्र अंतर आगाऊ रकमेची मागणी करून त्या प्रमाणे नोंदी होऊ लागल्या.योग्य वेळ येताच त्याने आपले दात दाखवले आहे.
सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,”स्वस्तात सोने देतो,जमीन देतो,अशा घटनांतून स्वस्ताईचे आमीष दाखवून लुबाडणूक करणाऱ्यांची कमी नाही.या जगात कोणीच स्वस्त आणि फुकट देत नाही मात्र या मायावी शब्द जंजाळाचा फायदा दाखवून मात्र नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूंक मात्र होत आलेली आहे.तरीही नागरिक “स्वस्तात” या शब्द जंजाळावर विश्वास ठेवून अनेक जण आपले हसे करताना दिसत आहे.याला जेऊर कुंभारी येथील नागरिकही अपवाद नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून जेऊर कुंभारी येथील फिर्यादी व डंपर चालक बाबासाहेब गोसावी यांना यड्राव फाटा ता.ईचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील आरोपी शिवानंद कुंभार याने अशाच शब्द जंजाळात फसवून स्वस्तात स्टील व सिमेंट देतो म्हणून अनेक ठेकेदार,इंजिनिअर,नवीन शाळा इमारत बांधकाम करणारे शाळा संचालक आदींना आपल्या फाशात अडकवले आहे. सुरुवातीला पंचवीस-तीस टक्के सवलतीच्या दराचे आमिष दाखवले व ते पाळले मात्र अंतर आगाऊ रकमेची मागणी करून त्या प्रमाणे नोंदी होऊ लागल्या. (बरेच दिवस उत्तर भारतातील रहिवासी मात्र पिंपळगाव,निफाड भागात येऊन द्राक्ष व कांदे व्यापाऱ्याप्रमाणे) त्या ऑर्डर काही महिने पूर्णही केल्या.त्यातून पूर्ण विश्वास संपादन केला व योग्य संधी पाहू लागला. चांगला माल जमा झाल्यावर मात्र एक दिवस अचानक आपला बाड बिस्तार गुंडाळला व फरार झाला आहे.त्याची कुणकुण लागताच अनेकांनी त्याचे फोन लावून पहिले मात्र तो ‘नॉट रीचेबल’ झाला आणि मग हि मंडळी भानावर आली आहे.अशीच घटना जेऊर कुंभारी येथील फिर्यादीबाबत घडली असून त्यांची नुकतीच वरील भामट्याने दि.२८ संप्टेंबर २०२० रोजी आरोपीच्या खात्यात आगाऊ पाठवलेले ०३ लाख २४ हजार रुपये मुदतीत दिले नाही.अथवा त्या बदल्यात स्टील किंवा सिमेंट न देता फसवणूक केली आहे.तो रक्कम घेऊन परत दि.२० जुलै २०२१ पर्यंत परत करणार होता असा फिर्यादीचा दावा आहे.मात्र त्याने ती रक्कम अद्याप करत केली नाही.म्हणून फिर्यादीने दि.०३ सप्टेंबर रोजी हा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे या सिमेन्ट आणि स्टील प्रकरणाला वाचा फुटली आहे.आता पोलिसांपुढे या ठकाला जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७१/२०२१ भा.द.वि.कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत.ते हे आव्हान कसे पेलतात याकडे कोपरगावच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.