गुन्हे विषयक
कोल्हे कारखाण्यात पाईप चोरी,तीन जणांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या इशांन्येस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातुंन आरोपी वनराज संतोष माळी (वय-३२),आकाश काशिनाथ सोळसे (वय-२४),किशोर रामभाऊ आहेर (वय-२२) सर्व रा.औद्योगिक वसाहत संवत्सर आदी तीन जणांनी सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या तीन पितळी पाईपची नुकतीच चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांच्या विरुद्ध या कारखाण्याचे सुरक्षा कामगार नवनाथ गोरक्षनाथ वक्ते (वय-५०) रा.जेऊर कुंभारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हे सहकारी साखर कारखान्यातून नुकतीच दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास १५ हजार रुपये किमतीच्या सहा पितळी पाईपचे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हि चोरी करताना या चोरट्यांना रंगेहात पकडल्याचे सांगण्यात आले आहे.याबाबत फिर्यादी नवनाथ वक्ते यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या नजीक साधारण तीन कि.मी.अंतरावर संजीवनी सहकारी कारखाना असून त्याचे नुकतेच शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना असे नामांतर झालेले आहे.या कारखान्यात विविध अनावश्यक कचरा गोळा करण्यासाठी एका ठेकेदारास काम दिले दिले आहे.त्याच्याकडे काही कामगार असून ते मजुराने हे काम करतात.त्याठिकाणी कारखान्यात सुरक्षा कर्मचारी असून त्यांची नजर चुकवून कारखान्यातून नुकतीच दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास १५ हजार रुपये किमतीच्या सहा पितळी पाईपचे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हि चोरी करताना वनराज माळी,आकाश सोळसे,किशोर आहेर हे तीन कामगार आढळून आले आहे.या चोरट्यांना सुरक्षा कर्मचाऱ्याने रंगेहात पकडल्याचे सांगण्यात आले आहे.याबाबत फिर्यादी व सुरक्षा कर्मचारी नवनाथ वक्ते यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२७०/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे तपास करीत आहेत.