जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी आणला सरकारी कामात अडथळा,चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत असलेल्या हॉटेल स्वस्तिक येथे काही तरुणांनी धिंगाणा घातला असून त्याबाबत गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली असतां त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता शहर पोलिसांना मारहाण करण्याचा अनास्था प्रसंग घडला असून या बाबत शहर पोलिसांनी आरोपी यांचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पंधरा दिवसात असा तिसरा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान चार आरोपीत आनंद परदेशी व सुनील बाळासाहेब पांडेसह चार आरोपी निष्पन्न झाले आहे.यातील पांडे हा कोपरगाव शहर भाजपचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष असल्याची माहिती असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपीत भाजप युवा मोर्चाचा एक नुकतीच नियुक्ती केलेला शहर उपाध्यक्ष असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.या पूर्वी दि.२२ जुलै रोजी कोपरगाव नगर परिषदेचे सेना गटनेते,जिल्हा उपाध्यक्ष,माजी शहर प्रमुख यांना सरकारी कामात अडथळा आणणे व अधिकारी कर्मचारी यांना मारहाण व सरकारी कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी अटक केली होती.खिर्डी गणेश येथील रहिवासी ग्रामसेवक महिला यांनाहि धमकविण्याचा प्रयत्न झाला असताना तालुक्यात आज हि तिसरी मोठी घटना घडली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील जंगली महाराज आश्रमानजीक हॉटेल स्वस्तिक असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी खवय्यांची मोठी गर्दी होत असते.कोरोना साथ जोरात असूनही यात खंड पडलेला नाही.काल रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली की,हॉटेल स्वस्तिक या ठिकाणी काही तरुण हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहे.त्या ठिकाणी पोलिसांनी जाणे आवश्यक आहे.याची खबर प्रथम फिर्यादी सहाय्यक फौजदार बबन नाथा साठे व पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे,श्री ढाकणे,पो.हे.कॉ.कांबळे व त्यांचे सहकारी गेले असता त्या ठिकाणी आरोपी आनंद भारतसिंग परदेशी (वय ३० वर्षं) रा.निवारा,कोपरगाव सुनिल बाळासाहेब पांडे (वय-२८) वर्षं रा. बेट,कोपरगाव,पट्या उर्फ विजय लक्ष्ण इस्ते,आकाश रंगनाथ लोखंडे दोन्ही रा.तिनचारी, कोकमठाण ता. कोपरगाव हे तेथील स्वस्तिक हॉटेल कर्मचाऱ्याना मारहाण करत होते.त्या वेळी फिर्यादिसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना,तुम्ही भांडणे करू नका,असे समजावून सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी,”आरोपी यांनी मोठमाठ्याने आरडाओरडा करुन पोलिसांना धक्काबुक्की करून फिर्यादि व त्यांचे सहकाऱ्यांवर आरोप करून त्यात,”तुम्ही पैसे घेऊन हॉटेल चालू देता,तुम्ही येथून चालते व्हा,येथे कशाला आले,आम्ही पैसे दिले असून जेवण केल्याशिवाय उठणार नाही”असे म्हणून मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन नगर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडील क्र.डी.सी./कार्या ९ ब १/१५०५/२०२१ अहमदनगर दि.२६ जून २०२१ च्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे.वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दप्तरी दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप सातव यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान यातील आनंद परदेशी रा.निवारा व सुनिल पांडे हे दोन आरोपी ताब्यात घेतले असून पट्या उर्फ विजय लक्ष्मण इस्ते व आकाश रंगनाथ लोखंडे हे दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे.यातील अटक दोन आरोपिंना आज कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान कोपरगाव शहर पोलिसात या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.२४८/२०२१भा.द.वि कलम ३५३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close