आदिवासी विकासइतिहास
आपल्या कामाची सुरुवात धार्मिक कार्यातून हे आपले नशीब-…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या विधानभवनात नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आणि लगेच पहिला कार्यक्रम म्हणून कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग आला.निश्चितपणे हे मी माझे भाग्य समजत असून चांगल्या कामाची सुरुवात एका धार्मिक कार्यक्रमातून झाली असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे नवनियुक्त आ.विवेक कोल्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान यावेळी दिंडोरी पिठाचे आण्णासाहेब मोरे यांनी आ.आशुतोष काळे यांनी स्वामी सेवेचा वारसा पुढे चालवत ठेवला असून त्यांच्या रूपाने काळे कुटुंबाची तिसरी पिढी स्वामी सेवेचे कार्य करीत आहे.कोळपेवाडी कारखाना कार्यस्थळावर गेल्या ४० वर्षांपासून नाम साप्ताह केले आहेत.माजी.खा.स्व.शंकरराव काळे यांचेसह त्यांच्या परिवाराने स्वामींची सेवा केली आहे. आणि आजही श्री विष्णू मंदिरात श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामींची सेवा सुरु असल्याने त्याबाबत आण्णासाहेब मोरे यांनी या कुटुंबाचे कौतुक केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र व श्री दत्त ध्यान केंद्राच्या वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.या निमित्ताने श्री स्वामी समर्थ कथा, अखंड नामजप यज्ञ तसेच श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी दिंडोरी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे,श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज,संत जनार्दन स्वामी समाधी स्थान कोपरगाव बेटाचे महंत रमेशगिरीजी महाराज,हरिपाठ आश्रम शिर्डी येथील काशिकानंद महाराज,राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथील राघवेश्वरानंद महाराज,सुदर्शन टीव्हीचे संचालक सुरेश चव्हाणके,सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आ.माणिक कोकाटे,नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खा.राजाभाऊ वाजे,कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान,संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे,कोल्हे कारखान्याचे संचालक अरुण येवले व अशोक भाकरे,ह.भ.प ज्ञानेश्वर ठाकरे ,स्वप्निल भोसले,केदारनाथ तनपुरे,दिलीप बनकर,कारवाडी गावच्या महिला सरपंच रुपाली जाधव यांच्यासह परिसरातील स्वामी सेवेकरी व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यात्मिक ऊर्जेने अनेकांचे जीवनमान बदलले आहे.अतिशय नवचैतन्य या केंद्राच्या सानिध्यात जाणवते.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका आधाराने मोठी मोठी संकटे परततात.संयम ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच ही स्वामींची शिकवण अंगिकारून जीवन निश्चितच आदर्श बनवता येते असेही आ.कोल्हे शेवटी म्हणाले आहे.यावेळी स्वामी सेवेकरी तथा कथाकार संतोष जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले.



