कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने बिबवे यांचा सन्मान

न्यूजसेवा
(कुंभारी प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तालुक्यातील कुंभारी येथील कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांची नुकतीच नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या गावी कृषी सहाय्यक बदली झाली झाल्याने त्यांच्या लक्षवेधी सेवेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे.
निलेश बिबवे यांनी माहेगाव देशमुख,कुंभारी,कोळपेवाडी,चास नळी,वडगाव आदी गावांचा पदभार संभाळला शेतकऱ्यांसाठी चोवीस तास व्हाट्सअप फेसबुक व प्रत्यक्ष मेळाव्याच्या माध्यमातून अविरत सेवा देणारा आदर्श कृषी सहाय्यक म्हणून ओळख निर्माण केली होती.
कृषी सहाय्यक श्री बिबवे हे २००८ पासून कोपरगाव तालुक्यात कार्यरत असलेले निलेश बिबवे माहेगाव देशमुख, कुंभारी,कोळपेवाडी,चास नळी,वडगाव आदी गावांचा पदभार संभाळला शेतकऱ्यांसाठी चोवीस तास व्हाट्सअप फेसबुक व प्रत्यक्ष मेळाव्याच्या माध्यमातून अविरत सेवा देणारा कृषी सहाय्यक म्हणून त्यांची कुंभारी परिसराला ओळख होती शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतात बांधावर अविरत मार्गदर्शन केले बियाणे वाटप गांडूळ नॅडेप पिक विमा नुकसानीच्या प्रसंगी पंचनामे कृषी विभागाच्या विविध योजना सक्षमपणे राबविल्या आधी कामकाजामध्ये सतत शेतकऱ्यांसाठी अविरत काम करणारा कृषी सहाय्यक आज बदली होऊन नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे जात आहे. यामुळे शेतकरी फार भावुक झाले शेती शाळेच्या माध्यमातून तालुका जिल्हा पातळीवर विशेष योगदान देणाऱ्या निलेश बिबवे यांनी शेतकऱ्यांना पिक तंत्रज्ञानावर अविरत मार्गदर्शन केले.यावेळी देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच राघवेश्वर देवस्थान चे राघवेश्वरनंद गिरी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुशांत घोडके, अर्जुन घुले,अनिल कातकडे, वसंत घुले,श्री खवले , गहिनीनाथ घुले, सागर गायकवाड, बापू चव्हाण आणि समस्त ग्रामस्थ
आदींच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला या वेळी महाराजांनी कार्याचा उल्लेख करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.