गुन्हे विषयक
मित्रानंच मित्राच्या 3 वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून फेकलं
मुंबई, 8 सप्टेंबर : मुंबईतील कुलाबा परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीनं शेजाऱ्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. चिड आणणारी ही घटना शनिवारी (7 सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कुलाबा येथील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीतील ही घटना आहे. मुलीला खाली फेकल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. डॉक्टरांनी उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित केलं. आरोपीनं मुलीला इमारतीतून खाली का फेकलं? याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.