जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कार्तिकची कारकिर्द धोक्यात, त्या चुकीमुळे BCCI ने पाठवली नोटीस

जाहिरात-9423439946
कार्तिकची कारकिर्द धोक्यात, त्या चुकीमुळे BCCI ने पाठवली नोटीस

मुंबई, 07 सप्टेंबर : भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची कारकिर्द धोक्यात आली आहे. बीसीसीआयनं त्याला कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. दिनेश कार्तिकनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात हजेरी लावली होती. या संघाचे मालकी हक्क शाहरुख खानकडे आहेत. कार्तिक सीपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यावेळी त्रिनबागो नाइट रायडर्सच्या जर्सीत दिसला होता.

बीसीसीआय़च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं की, दिनेश कार्तिकला नोटिस पाठवण्यात आली आहे. आम्हाला काही फोटो मिळाले असून त्यात कार्तिक त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंगरूममध्ये बसलेला दिसत आहे. याबद्दल बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी नोटिस जारी करून त्याचा करार रद्द का करू नये असा प्रश्न विचारला आहे.

अधिकाऱ्यांनी म्हटलं की, बीसीसीआसोबत करार असल्यानं कार्तिकला आयपीएलशिवाय इतर कोणत्याही फ्रँचाइजी लीगमध्ये सामिल होता येत नाही. याबद्दल बीसीसीआयच्या करारात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. हे नियम प्रथम श्रेणीतील सर्व क्रिकेटपटूंना लागू आहेत.

कार्तिक सीपीएलमध्ये सहभागी झाल्याचा एक फोटो बीसीसीआयला मिळाला आहे. यामध्ये कार्तिक ड्रेसिंग रूममध्ये ब्रॅडन मॅक्युलमसोबत बसल्याचं दिसत आहे. कार्तिकनं यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं होतं. आयपीएलमध्ये कार्तिक कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. आतापर्यंत कार्तिककडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, कार्तिक बिनशर्त माफी मागू शकतो असं म्हटलं जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close