जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गौतम सहकारी बँकेला ५८.४४ लाखाचा नफा,वार्षिक सभा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक- नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी)असून

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारात अग्रगण्य गणल्या जाणाऱ्या गौतम सहकारी बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ५८.४४ लाख रुपये नफा झाला असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आज सकाळी संपन्न झालेल्या वार्षिक सभेत दिली आहे.
गौतम सहकारी बँकेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गौतम सहकारी कुक्कुटपालन संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.

सदर प्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, स्नेहलता शिंदे,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, कुक्कुट पालनचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, बाळासाहेब बारहाते, राजेंद्र घुमरे, अशोक तीरसे, मीननाथ बारगळ, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, राजेंद्र मेहेरखांब, आनंदराव चव्हाण, विठ्ठलराव आसने, काकासाहेब जावळे, अशोकमामा काळे,अरुण चंद्रे, गौतम बँक व शरद पवार पतसंस्थेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सचिव सुनील कोल्हे,कार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यद, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड, पवार पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब काळे, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे व्यवस्थापक सुरेश पेटकर आदी मान्यवरांसह सर्व संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सहकार कायद्याच्या दृष्टीकोनातून सभासद हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सभासदांनी बँकेत व्यवहार करून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या पाहिजे. कर्ज व्यवहार, बँकेने उपलब्ध करून दिलेली लॉंकर सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. घेतलेल्या कर्जाचा विनियोग चांगल्या कामासाठी करून कर्ज वेळेत फेडावे. चालू वर्षी गौतम सहकारी बँकेच्या सभासदांना ८ % लाभांश देण्याचा मानस असून आपल्या या दोनही संस्थांचे व्यवहार रिझर्व बँकेच्या नियमानुसार सुरु आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे लाभांश वाटपासाठी परवानगी मागणार आहे.परवानगी येताच लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी टाळ्यांच्या गजरात सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

सदर प्रसंगी शरद पवार पतसंस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून सभासदांना याहीवर्षी १५ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गौतम सहकारी बँक, शरद पवार नागरी सहकारी पतसंस्था व गौतम सहकारी कुक्कुट पालन संस्था प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

या वेळी गत आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी मांडला. सभेच्या अध्यक्षपदाची सुचना माधवराव खिलारी यांनी मांडली तर गोरक्षनाथ दवंगे यांनी सदर सूचनेस अनुमोदन दिले.

सभेचे प्रास्तविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले. सूत्रसंचलन प्रशासकीय अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक साहेबलाल शेख यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close