गुन्हे विषयक
कोपरगावात अंगावर गाडी घालून एकास मारहाण,तिघांवर गुन्हा

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी निलेश माधव मेहेरखांब वय-(२२) हे आपल्या स्कुटी प्लेझर (क्रं.एम.एच.१७ सी.जी.०१८८) वरून जात असताना सुरेगाव कोळपेवाडी रोडवर पी.जे.स्कूल चौकाजवळ महिंद्रा जितो गाडीत बसलेले आरोपी प्रवीण हौशीराम गायकवाड याने हाक मारून त्यांना थांबवून आरोपी सचिन हरिभाऊ मेहेरखांब याने आपल्या ताब्यातील महिंद्रा जितो हि गाडी चालु करून ती फिर्यादीच्या अंगावर घालून त्यांना जखमी केले व गाडीतील हत्यारांनी त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हा आपल्या दुचाकीवरून आपल्या घराकडे जात असताना पी.जे.स्कूल चौकात आल्यावर तेथे आधीच असलेले व महिंद्रा जितो गाडीत बसलेला आरोपी याने प्रवीण गायकवाड याने त्यांना हाक मारून त्याना थांबण्यास भाग पाडले व आरोपी सचिन मेहेरखांब यांने आपली उभी गाडी सुरु करून ती फिर्यादी यांच्या अंगावर घातली व गाडीत ठेवलेले हत्यारे लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,दगड आदिंच्या साहाय्याने त्यांच्या पायाच्या नळ्यावर,डोक्यावर,तोंडावर,छातीवर,पोटावर,मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात नोकरी करत असून ते दि.२६ जानेवारी रोजी आपल्या वरील दुचाकीवरून आपल्या घराकडे जात असताना पी.जे.स्कूल चौकात आल्यावर तेथे आधीच असलेले व महिंद्रा जितो गाडीत बसलेला आरोपी याने प्रवीण गायकवाड याने त्यांना हाक मारून त्याना थांबण्यास भाग पाडले व त्यांनी आपली गाडी थांबवली असता आरोपी सचिन मेहेरखांब यांने आपली उभी गाडी सुरु करून ती फिर्यादी यांच्या अंगावर घातली व गाडीत ठेवलेले हत्यारे लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,दगड आदिंच्या साहाय्याने त्यांच्या पायाच्या नळ्यावर,डोक्यावर,तोंडावर,छातीवर,पोटावर,मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.फिर्यादी माराच्या भीतीने पळून जात असताना त्यास,”आमच्याकडे रागाने पाहतो,म्हुणून शिवीगाळ,केली व “आमच्यावर केस केली तर तुला जीवे ठार मारून टाकू”अशी धमकी दिली आहे.व दुचाकीचे मोठे नुकसान केले आहे. या घटनेत आरोपी निलेश मेहेरखांब हे गंभीररित्या जखमी झाले आहे.त्यांना उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या बाबत शिर्डी येथील पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.माघाडे यांनी जखमीचा जबाब नोंदवला व त्या नंतर तो गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४२/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२५,५०४,५०६,४२७,३४ प्रमाणे आरोपी सचिन मेहेरखांब व प्रवीण गायकवाड व करण विजू गायकवाड सर्व रा.सुरेगाव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.