जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

माळी शिक्षण संस्थेच्या मुख्य विश्वस्तपदी..यांची निवड

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत मुख्य विश्वस्त विश्वनाथ भालिंगे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या शिक्षण संस्थेचा लौकिक मोठा असून या संस्थेच्या हितार्थ काम करून या हितासाठी आपण जास्तीत जास्त योगदान देऊन संस्थेचे नाव देशभर उज्वल करू-नूतन मुख्य विश्वस्त पद्मकांत कुदळे,कोपरगाव.

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेची नुकतीच संस्थेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयांत बैठक संपन्न झाली आहे.या वेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त विश्वनाथ भालिंगे यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते.त्या जागेवर हि निवड अन्य सदस्यांनी केली आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत,सरचिटणीस प्रशांत एकतपुरे,विश्वस्त नीलिमा सोनवणे,नाशिक,प्रकाश लोंढे,रवी चौधरी,पुणे,प्रा.संपतराव शिंदे,फलटण,एम.बी.महाजन,जळगाव,तज्ञ विश्वस्त प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ आदी विश्वस्त उपस्थित होते.

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे हे १९८४ साली नगराध्यक्षपदी निवड झाली होती त्या वेळी त्यांनी पालिकेत लक्षवेधी केले होते.ते कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष आहे.ते कोपरगाव तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयावर सदस्य असून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी कार्यरत आहे.त्यांनी या संस्थांवर लक्षवेधी काम केलेले आहे.माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे संस्थेचे देशभरात जवळपास १४ हजाराहून अधिक सदस्य आहेत.निवड झाल्यावर त्यांचा मावळते मुख्य विश्वस्त विश्वनाथ भालिंगे व प्रा.एम.एम. फुले यांनी शाल,श्रीफळ देऊन गौरव केला आहे.त्यावेळी उपस्थितांचे सरचिटणीस प्रशांत एकतपुरे यांनी आभार मानले आहे.

या शिक्षण संस्थेच्या हितासाठी आपण जास्तीत जास्त योगदान देऊन संस्थेचे नाव देशभर उज्वल करू असे आश्वासन नूतन विश्वस्त पद्मकांत कुदळे यांनी उपस्थितांना दिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close