गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील एका पंचवीस वर्षीय शेतकरी महिलेचा ती आपल्या घरात स्वयंपाक करत असताना आरोपी विजय आनंदा निकम व सुशीला आनंदा निकम दोघे रा.उक्कडगाव यांनी मागील बाजूने प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उक्कडगाव येथील फिर्यादी महिला हि आपल्या घरात स्वयंपाक करत असताना यातील आरोपी विजय निकम हा फिर्यादी महिलेच्या घरात येऊन तो फिर्यादी महिलेच्या मागील बाजूने होऊन त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व तिचा विनयभंग केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि उक्कडगाव येथील रहिवाशी असून दोन्ही आरोपी हे हि त्याच गावातील रहिवाशी आहेत.रविवार दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला हि आपल्या घरात स्वयंपाक करत असताना यातील आरोपी विजय निकम हा फिर्यादी महिलेच्या घरात येऊन तो फिर्यादी महिलेच्या मागील बाजूने होऊन त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व तिचा विनयभंग केला आहे.व दोन्ही आरोपी यांनी सदर महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.अशा आशयाची फिर्याद दाखल झाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विजय निकम व सुशीला निकम यांच्या विरोधात आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४३/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,३५४(अ),३२३,५०४,५०६,१०९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ए. एम.आंधळे हे करीत आहेत.