गुन्हे विषयक
ट्रक चालकाने केली फसवणूक,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील पशुखाद्याचा कच्चा मालाचे व्यापारी जानव्ही मंदार आढाव यांची एका ट्रक चालकाने कच्चा माल आपल्या ट्रकमध्ये भरला आहे व तो आपण पोहचून देतो असे म्हणून आगाऊ रक्कम ऑनलाइन भरून घेऊन आरोपी प्रभुद्याल रामप्रसाद रा.दिनापूर भिंड,मध्यप्रदेश याने फसवणूक केली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेश दिनापूर भिंड येथील ट्रक चालक यास दोन ट्रक माल नोंदवला व तो आणण्यासाठी एका ट्रक चालकास आदेश दिला मात्र त्याने दोन ट्रक साठी इंधन खर्चा पोटी आपण माझ्या खात्यावर ऑनलाइन साठ हजारांची रक्कम वर्ग करावी अशी गळ घातली ती फिर्यादी महिलेने मान्य केली व त्या आरोपीच्या खात्यावर रुपये ६० हजार वर्ग केले त्या नंतर तो अज्ञातवासात गेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील व्यापारी महिला जान्हवी मंदार आढाव यांचा पशु खाद्य बनविण्यास लागणारा ठोक कच्चा माल पुरविण्याचा व्यवसाय आहे.त्यासाठी ते भारतभरातून आपला कच्चा माल ने-आण करत असतात.असाच एक आदेश त्यांनी मध्यप्रदेश दिनापूर भिंड येथील ट्रक चालक यास दोन ट्रक माल नोंदवला व तो आणण्यासाठी एका ट्रक चालकास आदेश दिला मात्र त्याने दोन ट्रक साठी इंधन खर्चा पोटी आपण माझ्या खात्यावर ऑनलाइन साठ हजारांची रक्कम वर्ग करावी अशी गळ घातली ती फिर्यादी महिलेने मान्य केली व त्या आरोपीच्या खात्यावर रुपये ६० हजार वर्ग केले आहे.मात्र त्या नंतर आरोपीने आपला संपर्क क्रमांक बंद करून फिर्यादी महिलेची फसवणूक केली आहे.हि घटना गत महिन्यात दि.१० नोव्हेबर रोजी सकाळी १० वाजता ते दि.१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला जान्हवी आढाव यांनी काल साडे चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८४३/२०२० भा.द.वि.कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पवार हे करीत आहेत.या घटनेने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.