कोपरगाव तालुका
कोपरगावात नेत्ररोग शिबिर उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराच्या नवव्या दिवशी कोपरगावातील लक्ष्मीनगर भागातील हनुमान मंदिरात नागरिकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला असल्याची शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद जोशी,कलविंदर दडियाल व ठकाजी लासुरे यांच्या हस्ते झाले आहे.आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हे शिबिर पार पडत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक ठकाजी लासुरे,शिवसेना उपशहरप्रमुख आकाश कानडे,नागरपरिषदेचे माजी शहर अभियंता रवींद्र सोमोसे,वाहतूक सेनेचे राकेश वाघ,विभागप्रमुख किरण अडांगळे,सागर कानडे,संतोष देवरे,गणेश भसाळे,करण देवरे,वेदांत बोरावके,साई औताडे,सचिन बोधले,तेजस पगारे व आदी शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले आहे.