कोपरगाव तालुका
कोपरगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात आगामी २ व ३ जानेवारी दरम्यान कै.सुशीलाबाई शंकरराव काळे यांच्या स्मृती-प्रीत्यर्थ महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर वक्तृत्त्व स्पर्धेचे नऊ विषय आहेत.ही स्पर्धा ऑनलाईन होत असल्याने स्पर्धकांनी महाविद्यालयाच्या सूचित संकेत स्थळाला भेट देवून आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.
सदर स्पर्धेच्या लौकिकानुसार या स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत.कै.सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे :एक समर्पित जीवन, कोविड-१९ या काळात काय कमावले ? काय गमावले ?, सलाम…कोरोना योद्ध्यांच्या योगदानाला आणि समर्पणाला,स्वच्छ भारताचे स्वप्न,वास्तव आणि जागृती. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. हे,निर्भया. तू अजूनही भयग्रस्तच…!,ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया : वास्तव आणि भवितव्य, कर्मवीर शंकरराव काळे यांचे सामाजिक, शैक्षणिक धोरण आणि कार्य,ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ हेच अध्वर्यू .
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी http://forms.gle/8kaWaJtn3oBk7rQ4A या संकेत स्थळाला वर नोंदणी करावी.
सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील दोन स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी संयोजन समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे, डॉ.सुरेश काळे, श्रीमती छाया शिंदे व संयोजन समिती सदस्यांशी संपर्क करावा.असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी शेवटी केले आहे.