गुन्हे विषयक
तरुण गायब,कोपरगाव पोलिसांत तक्रार दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आपला मुलगा ज्ञानेश्वर अशोक गमे (वय-२६ ) हा आपल्या आईला सिन्नर येथे सोडून पुढे मी कामाला जातो असे सांगून निघुन गेला तो परत आला नाही अशी तक्रार गायब इसमाचा पिता अशोक विश्वनाथ गमे यांनी आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
आपण मढी बुद्रुक येथील रहिवाशी असून आपला मुलगा हा दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता आपल्या आईस सिन्नर येथे सोडून कामाला जातो असे सांगून गेला तो सायंकाळी घरी परत आला नाही.आपण त्यास त्याच्या भ्रमंध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता.तो स्थापित होऊ शकला नाही.दुसऱ्या दिवशी आपण त्याचा नातेवाईक व अन्य आप्तांकडे सिन्नर.नाशिक,निफाड,कोपरगाव आदी ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून आला नाही.
तक्रारदार अशोक गमे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,”आपण मढी बुद्रुक येथील रहिवाशी असून आपला मुलगा हा दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता आपल्या आईस सिन्नर येथे सोडून कामाला जातो असे सांगून गेला तो सायंकाळी घरी परत आला नाही.आपण त्यास त्याच्या भ्रमंध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता.तो स्थापित होऊ शकला नाही.दुसऱ्या दिवशी आपण त्याचा नातेवाईक व अन्य आप्तांकडे सिन्नर.नाशिक,निफाड,कोपरगाव आदी ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून आला नाही.त्याचा बांधा सडपातळ,उंची साडेपाच फूट,अंगात राखाडी सदरा,निळ्या रंगाची विजार,शिक्षण आठवी पर्यंत असून डोक्याचे केस कुरळे आहेत.त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी संच आहे,त्यात आयडिया कंपनीचे सिम कार्ड आहे.या बाबत कोपरगाव तालुका पोलिसानी अकस्मात नोंदणी पुस्तकात नोंदणी केली असून हा तरुण कोणाला आढळल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.श्री.कुसारे हे करित आहेत.