जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत…या शाळेचे ०९ विद्यार्थी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता पाचवी) निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले अस असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संकल्पित छायाचित्र.

“इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पी.यू.पी.) घेतली जाते.ही एक अतिशय स्पर्धात्मक परीक्षा असून,गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र दिले जाते.त्यात या शाळेने ही यश मिळवले आहे.यापूर्वी या शाळेच्या  विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले होते.त्यात कु.अमिता जालिंदर थोरात हिची इस्रोत निवड झाली होती हे विशेष !


   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पी.यू.पी.) घेतली जाते.ही एक अतिशय स्पर्धात्मक परीक्षा असून,गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र दिले जाते.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते.या परिक्षेत जवळके येथील जिल्हा परिषद शाळेच्या 19 पैकी पात्र ठरलेल्या 09 विद्यार्थ्यांत गायत्री दादासाहेब थोरात -228,कृष्णाई विकास कोटकर-198,चेतन सचिन थोरात-194, ज्ञानेश्वरी नंदू थोरात-182,मानवी विनोद जैस्वाल-178,ईश्वरी विठ्ठल थोरात-160,रोहन बबन शिंदे -154,दिया लहानु थोरात-140,पाडेकर दर्शन प्रदीप पाडेकर-134 गुण मिळवीले आहे.

      या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड,श्रीमती एम.व्हि.वामन,एम,जी.पावसे,श्रीमती उंडे व्हि.एस.,श्रीमती बागुल के.यू.आदींचे मार्गदर्शन लाभले होते.


   या यशस्वी विद्यार्थ्यांचे शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,सेवानिवृत उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,ग्रामविकास अधिकारी परशराम हासे,माजी उपसरपंच विजय थोरात डी.के.थोरात,गोरक्षनाथ थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,विश्वनाथ थोरात,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव थोरात,अशोक शिंदे,चंद्रकांत थोरात,रामनाथ थोरात,अरुण थोरात,गणेश थोरात,विजय शिंदे,लक्ष्मण थोरात,प्रकाश थोरात,शाळा समिती अध्यक्ष,सदस्य आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close