धार्मिक
..या ठिकाणचा खंडोबा मंदिर”वर्धापण दिन”सोहळा रद्द

जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेले व नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी म्हणून ओळख असलेल्या राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील खंडोबा मंदिराचा दि.१६ नोव्हेंबर रोजी होणारा वर्धापनदिन अर्थात भाऊबिज उत्सव यावर्षी कोरोना महामारी मुळे रद्द करण्यात आला आहे.शासनाच्या नियमांचे पालन करून गर्दी होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.
श्री.क्षेत्र वाकडी येथील भाऊबिज उत्सवास महाराष्ट्र राज्यातुन शेकडो भाविक व वाघे मंडळीचे ताफे येत असतात यावर्षी हा उत्सव होण्याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती.याबाबत अनेकजण संपर्क साधत होते.या वर्षीसाठी उत्सव रद्द झाल्यामुळे अनेक भाविक व वाघे मंडळीमधे नाराजी पसरली आहे.मात्र कोरोना सारख्या गंभीर आजारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाकडी येथील खंडोबाची जागरण गोंधळाची पारंपरिक प्रथा दरवर्षी सुरु आहे.या प्रथेला खंड पडू नये म्हणून यावर्षी फक्त एकच जागरण गोंधळ घट भरून हा उत्सव साध्या पध्तीने साजरा होणार आहे.सध्या कोरोनामुळे सर्वत्र देवस्थान बंदच आहे.या काळात भाऊबीज उत्सव देखील यावर्षीसाठी रद्द करण्यात आला असून भाविकांनी घरी राहूनच पूजा करुन घट भरावे मंदीर परिसरात निदान यावर्षी तरी कोणी भाविकांनी घट भरण्यास येऊ नये असे खंडेराय मंदिर वर्धापन सोहळा,भाऊबीज उत्सव सोहळ्याचे आयोजक कै.रामनाथबाबा कोते यांचे सुपुत्र दत्तात्रय रामनाथ कोते यांनी जाहीर केले आहे.भाऊबीजच्या दिवशी वाकडी येथील खंडेराय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामनाथबाबा कोते यांनी केली आहे.त्या दिवसापासून दर वर्षी जागरण गोंधळ करून मंदिर वर्धापन सोहळा साजरा करण्याची प्रथा रामनाथबाबा कोते यांनी सुरु केली आहे.नुकत्याच पार पडलेल्या भाऊबिज उत्सव मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले यासंर्दभात भाऊबिज मंडळ,खंडोबा देवस्थान ट्रस्ट वाकडी,व वाकडी ग्रामपंचायतच्यावतीने प्रसिध्दी प्रसिद्धीपत्रक काढून भाविकांना तसेच वाघे मंडळीनां आव्हान करण्यात आले आहे