जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याच्या अस्तरिकरणाचे काम सुरु

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतीय अवजड व प्रवासी वाहनांना पुणे महानगरीसाठी सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव-संगमनेर या मार्गाची वर्तमान काळात पार वाट लागली होती मात्र त्याची गंभीर दाखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोपरगाव उपविभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून आता अस्तरीकरणाचे काम नुकर्तेच सुरु केल्याची माहिती सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळेगाव मार्गे संगमनेर या रस्त्याबाबत संवेदनशीलता दाखवत या विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी दाखल घेत या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम नुकतेच सुरु केले होते.व याबाबत खड्डे बुजवल्या नंतर या मार्गावरील डांबरीकरणाचा अस्तर देण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उत्तर भारतीय वाहनांना पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा आदी शहरांसाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून पुणतांबा फाट्यावरून पुढे झगडे फाटा,पोहेगाव,जवळके तळेगाव दिघे,वडगाव पान मार्गे संगमनेर व पुढे आळे फाटा व नारायणगाव आदी शहरावरून हा मार्ग पुढे पुण्याला जाण्यास सर्वात जवळचा ठरतो.संगमनेर येथे तो राष्ट्रीय महामार्गाला लागतो.या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते.शिवाय पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी हा मार्ग सर्वात जवळचा आहे.त्यामुळे प्रवासी व अवजड वाहतुकीचा या मार्गावरून कायम राबता असतो.व अवजड वाहने हि चाळीस ते पन्नास टनापेक्षा जास्त बोजा घेऊन या मार्गाने वाहतूक करतात.त्या प्रमाणात मात्र या रस्त्याची मजबुती केलेली दिसत नाही.या मार्गासाठी झगडे फाटा ते वडगाव पान या साठी जवळपास नव्वद कोटी रुपयांची मोठी तरतूद झाल्याची घोषणा झाली आहे.मात्र अद्याप त्याचे घोडे नेमके कुठे अडले हे समजण्यास मार्ग नाही.मात्र तूर्त तरी या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे होते.या बाबत रांजणगाव देशमुख येथील अड्.योगेश खालकर व अन्य कार्यकर्त्यांनी या विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.व आठ दिवसात काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.या बाबत संवेदनशीलता दाखवत या विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी दाखल घेत या मार्गावरील संगमनेर तालुका हद्द ते झगडे फाटा या मार्गवारील खड्डे बुजविण्याचे काम नुकतेच सुरु केले होते.व याबाबत खड्डे बुजवल्या नंतर या मार्गावरील डांबरीकरणाचा अस्तर देण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,शहापूर,बहादराबाद आदी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.या रस्ते दुरुस्तीनंतर अपघात कमी करण्यास मद्यत मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close