गुन्हे विषयक
तोतया पत्रकाराने केली 05 हजारांची खंडणी वसूल,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
मोबाईलच्या युगात आता सामाजिक संकेतस्थळावर बातमीदारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यातून अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहे.कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे अक्षय उर्फ संतोष चंद्रकांत निकम याचे विरुद्ध,”मी,पत्रकार असून,गोदावरी बचाव संघटनेत काम करतो” असे सांगुन तहसिलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडून खोट्या कारवाया करायला लावून व पैसे दिले नाही तर वाळु वाहतुक करणाऱ्यांना सांगुन फिर्यादीचा मर्डर करून टाकिन” अशी धमकी देऊन फिर्यादीस कडुन एकुण 05 हजार रुपये त्यात 03 हजार रुपये ‘फोन पे’ वर व 02 हजार रुपये रोख स्वरूपात घेऊन फिर्यादीकडून खंडणी वसुल केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

डिजिटल मीडियाच्या प्रसारामुळे कोणालाही स्वतःचे चॅनेल सुरू करणे सोपे झाले आहे.मात्र,याचा गैरफायदा घेऊन काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी,ब्लॅकमेलिंग आणि प्रशासकीय कामात अडथळा आणत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.अनेक तोतया पत्रकार शासकीय अधिकारी,व्यावसायिक किंवा बांधकाम व्यावसायिकांना बातम्यांची किंवा स्टिंग ऑपरेशनची भीती दाखवून पैशांची मागणी करताना आढळले आहेत.यूट्यूब किंवा सोशल मीडिया पोर्टल्ससाठी अधिकृत नोंदणी किंवा पत्रकारितेच्या पदवीची सक्ती नसल्यामुळे कोणीही गळ्यात ‘प्रेस’चे ओळखपत्र अंडकवून फिरत आहे.ही चिंता वाढवणारी घटना मानली जात आहे.
सोशल मीडिया,डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि यूट्यूब न्यूज चॅनेल्सचा वाढता विस्तारामुळे तोतया पत्रकारांची संख्या आणि त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईत झालेली वाढ खरोखरच चिंताजनक आहे.यामुळे मूळ,प्रामाणिक पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.डिजिटल मीडियाच्या प्रसारामुळे कोणालाही स्वतःचे चॅनेल सुरू करणे सोपे झाले आहे.मात्र,याचा गैरफायदा घेऊन काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी,ब्लॅकमेलिंग आणि प्रशासकीय कामात अडथळा आणत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.अनेक तोतया पत्रकार शासकीय अधिकारी,व्यावसायिक किंवा बांधकाम व्यावसायिकांना बातम्यांची किंवा स्टिंग ऑपरेशनची भीती दाखवून पैशांची मागणी करताना आढळले आहेत.यूट्यूब किंवा सोशल मीडिया पोर्टल्ससाठी अधिकृत नोंदणी किंवा पत्रकारितेच्या पदवीची सक्ती नसल्यामुळे कोणीही गळ्यात ‘प्रेस’चे ओळखपत्र अंडकवून फिरत आहे.कारवाई टाळण्यासाठी किंवा टोल वाचवण्यासाठी अनेक गैर-पत्रकार व्यक्ती आपल्या वाहनांवर ‘प्रेस’ लिहून फिरतात,ज्यांच्यावर सध्या कोपरगाव पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.तोतया पत्रकारांच्या वाढत्या संख्येमुळे प्रामाणिक आणि अधिकृत माध्यमांच्या पत्रकारांना संशयाने पाहिले जात आहे.पत्रकारितेच्या नावाखाली छुप्या पद्धतीने वसुलीचे प्रकार वाढल्याने समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे.अशीच एक घटना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली आहे.यातील आरोपी तोतया पत्रकार अक्षय उर्फ संतोष चंद्रकांत निकम,रा.कोळगाव धडी याने दि.10 सप्टेंबर 2026 रोजीचे सकाळी 11.27 वाजेचे दरम्यान वेळोवेळी कोळगाव थड़ी येथील आरोपी याने फिर्यादीस म्हणाले की,”तो पत्रकार असून गोदावरी बचाव संघटनेत काम करतो” असे सांगुन तहसिलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडून खोट्या कारवाया करायला लावीन व पैसे दिले नाही तर वाळु वाहतुक करणाऱ्यांना सांगुन फिर्यादीचा मर्डर करून टाकिन” अशी धमकी देऊन फिर्यादीस कडुन एकुण 05 हजार रुपये त्यात 03 हजार रुपये ‘फोन पे’ वर व 02 हजार रुपये रोख स्वरूपात घेऊन फिर्यादीकडून खंडणी वसुल केली असल्याचा आरोप असून याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याच गावातील फिर्यादी इसम दिपक चंद्रभान मोरे,(वय-32 वर्षे) याने गुन्हा दाखल केला आला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक कलाकारच चौधरी यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 399/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कायदा कलम ३०8 (4),119(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत.



