जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चंद्रभान कर्पे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


संवत्सर (प्रतिनिधी)

   कोपरगांव तालुक्यातील पढेगाव रोड संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चंद्रभान त्र्यंबकराव कर्पे (वय -८५ वर्षे) यांचे काल सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांचे पश्चात पत्नी अरुण कर्पे,बाळासाहेब कर्पे,विजय कर्पे ही तीन मुले तर मंदाबाई चौधरी व कलाबाई पुलाटे या मुली तसेच सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कै.चंद्रभान कर्पे यांचे छायाचित्र.

 

  कै.चंद्रभान कर्पे हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते.त्यांचा सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रात मोठा सहभाग होता.स्व.परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली संवत्सर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे काही काळ सदस्य तर काही काळ उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

  कै.चंद्रभान कर्पे यांनी संवत्सर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेमार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी म्हणून ते सर्वत्र परिचित होते.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर गोदावरी खोरे दूध संघ,संवत्सर ग्रामपंचायत,नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सेवा संस्था,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच विविध संस्थांचे संचालक,अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कै.चंद्रभान कर्पे यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त करुन परिवाराचे सांत्वन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close