जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिला बेपत्ता,कोपरगाव पोलिसांत नोंद दाखल!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी महिला बबूबाई वामन औताडे (वय -75) या दरवर्षी पंढरपूरच्या वारीत गेल्या असताना त्या अद्याप परत आलेल्या नाही त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे.त्यांनी आपले सर्व आप्तस्वकीय यांचेकडे शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद दाखल केली आहे.त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत असल्याचे दिसून आले आहे.

हरवलेल्या महिला बबूबाई वामन औताडे यांचे छायाचित्र.

 

  गेल्या दोन वर्षांत (२०२४-२०२५) बेपत्ता झालेल्या सुमारे २८ हजार महिला व मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही,ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.राज्यभरात दररोज सरासरी १३२ महिला बेपत्ता होत असल्याचे समोर आले आहे.मुंबई,पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,नवी मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.तर यात अहिल्यानगर जिल्हाही मागे नाही असे दिसून येत आहे.

    महाराष्ट्रात महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून,सन -२०२५ मध्ये राज्यात तब्बल ४८ हजार २७८ महिला आणि १३ हजार ११३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची शासकीय आकडेवारी समोर आली आहे.गेल्या दोन वर्षांत (२०२४-२०२५) बेपत्ता झालेल्या सुमारे २८ हजार महिला व मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही,ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.राज्यभरात दररोज सरासरी १३२ महिला बेपत्ता होत असल्याचे समोर आले आहे.मुंबई,पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,नवी मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.तर यात अहिल्यानगर जिल्हाही मागे नाही असे दिसून येत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील महिला बबूबाई वामन औताडे या दरवर्षी प्रमाणे पंढरपूरच्या वारीला गेल्या होत्या.त्या वारी झाल्यावर आळंदी करून घरी येत असत मात्र आळंदी आणि पंढरपूर यात्रा होऊन अनेक दिवस उलटले असताना त्या अद्याप परत आलेल्या नाहीत.त्यामुळे त्यांचे कुटुंबाची चिंता वाढली आहे.त्यांचा नातू अनिकेत देविदास औताडे यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीच्या दप्तरी नोंद केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन कुडके हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close