जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

..या खासदारांनी दिले ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळ – आ.काळेंचा दावा

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी खा.शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठे बळ दिले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच भोजडे येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

भोजडे येथील कार्यक्रमात बोलताना आ.काळे दिसत आहेत.

   कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण व दोन वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने बांधण्यात आलेल्या खोल्यांचे उद्घाटन करताना आ.आशुतोष काळे आणि मान्यवर.

  सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन,भाऊसाहेब सिनगर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम,दिलीप बोरनारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,माजी पं. स. सदस्य मधुकर टेके,गौतम बँकेचे संचालक विजयराव रक्ताटे,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक अनिल वल्टे,विक्रम सिनगर, जनरल बॉडी सदस्य नानासाहेब मते, शिवाजीराव ठाकरे,स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रकाश शिंदे,उद्धव बोरावके,अशोक काजळे,लक्ष्मण चौधरी,भोजडेचे सरपंच सुधाकर वादे,दहेगाव बोलकाचे सरपंच भरत चौधरी,कान्हेगावचे सरपंच गणेश सोनवणे, माजी उपसरपंच दत्तात्रय सिनगर, मुख्याध्यापक भास्कर काजळे,शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, पालक,शिक्षक,विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close