जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मंगळसूत्र चोरीतील दोन आरोपींवर मोक्का सदृश गुन्हा!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी छडा लावला त्यात आरोपी दिप भटु सातपुते,(वय-२४ वर्षे)रा.तळेगाव रोड,भिलहाटी लोणी,मयुर संजय ब्राम्हणे (वय-२४ वर्षे),वेताळबाबा चौक लोणी खुर्द,ता.राहाता,जि.अहिल्यानगर यांचा सहभाग आढळून आल्याने व त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचे उघड झाले असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचेवर अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे परवानगी घेऊन त्यांचेवर जन्मठेपेची शिक्षेचे तरतूद असलेले नव्याने तरतूद केलेले व मोक्कासारखे कलम भारतीय न्याय संहिता कलम १११ लागू केल्याने त्यांच्या या अपप्रवृत्तीस आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

 

मंगळसुत्र चोरीतील दोनही आरोपी हे सातत्याने सार्वजनिक ठिकाणी गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहाण करणे,जबरी चोरी,हिसकावुन चोरी करणे याबाबत त्यांचेवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असताना त्यांनी आपले बेकायदेशीर कृत्य करणे जारी ठेवले असल्याचे दिसून आले होते.परिणामी त्यामुळे त्यांचेवर गंभीर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे झाले होते. आरोपीविरुध्द गुन्हे दाखल असुन नमुद गुन्हयास भारतीय न्यायसंहिता २०२३ चे नविन कायदयाप्रमाणे कलम १११ हे वाढीव कलमा करीता उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचेकडुन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याला मंजुरी दिली असल्याने पोलिसांना आरोपींच्या कायमच्या मुसक्या आवळणे सोपे जाणार आहे.

  कोपरगाव,राहाता,संगमनेर,लोणी आदी शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होणे ही खरोखरच एक गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.हा केवळ एका मौल्यवान दागिन्याच्या चोरीचा विषय नसून,महिलांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या भावनांचा जवळचा प्रश्न आहे.अनेकदा गर्दीच्या ठिकाणी,प्रवासात किंवा निर्जन रस्त्यांवर महिलांना लक्ष्य करून अशा चोऱ्या केल्या जातात.त्यामुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचेवर मोठी कारवाई करणे क्रमप्राप्त झाले होते.याबाबत अनेक जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.त्यामुळे राजकीय नेते टीकेचे धनी बनले होते.त्यामुळे शहर पोलिसांवर कारवाईसाठी सामाजिक दडपण वाढले होते.त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.याबाबत त्यासाठी कोपरगाव शहरातील श्रीराम पार्क येथील एक घटना निमित ठरली असून यातील फिर्यादी महिला व त्यांची मुलगी असे त्यांचे स्कुटीवरुन शितल हॉटेल कडुन श्रीराम पार्ककडे जात असताना श्रीराम पार्कच्या गेट समोर,त्यांचे पाठीमागुन धक्का देवुन अनोळखी इसम यांनी एका विवो स्कुटीवरुन येवुन त्यांचे स्कुटीला पाठीमागुन धक्का देवुन फिर्यादी व यांची मुलगी हिचे गळयातुन बळजबरीने सोन्याचे मंगळसुत्र ओढुन घेवुन भरधाव वेगाने खडकी रोडने पुढे पोबारा केला होता.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं.४८८/२०२६ अन्वये दाखल केला होता.या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेतला असता त्यात राहाता तालुक्यातील लोणी येथील अट्टल गुन्हेगार दिप भटु सातपुते,मयुर संजय ब्राम्हणे असल्याचे निष्पन्न झाले होते.त्यामुळे पोलिस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.

  दरम्यान यात शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासाठी श्रीरामपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले होते.त्यात आरापींविरुध्द यापूर्वीही अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन ते संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले होते.सदर गुन्हयांत वरील आरोपींचा आलेख पाहता त्यांचे विरुध्द राहाता,संगमनेर,कोपरगाव शहर आदी ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे.ही बाब श्रीरामपूर येथील अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी गंभीरपणे दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध सदर गुन्हयातील आरोपी यांनी स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता संघटीत टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याने भारतीय न्याय संहीता २०२३ या कायद्यातील तरतुदींचा भंग केला असल्याचे उघड झाले आहे.संघटीत गुन्हेगारी संघाचा एक सदस्य म्हणुन किंवा या संघाच्या वतीने जबरी चोरी,हिसकावुन चोरी या धाकदपटशा किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर मार्गानी वित्तीय लाभासह भौतिक लाभ,प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्राप्त करुन संघटीत गुन्हेगारी करुन बेकायदेशीर कृती चालु ठेवली होती.त्यामुळे त्यांचेवर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे नविन कायदयाप्रमाणे कलम १११ अन्वये वाढीव कलम लावणेबाबत परवाणगी दिली आहे.मोक्का कायदयाप्रमाणे संघटीत गुन्हेगारीसाठी असणारी शिक्षा या कलमात नमुद केलेली आहे.त्यानुसार सदरची शिक्षा ही जन्मठेप पर्यंत आहे.त्यामुळे या आरोपींवर वचक बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

   मंगळसुत्र चोरीतील दोनही आरोपी हे सातत्याने सार्वजनिक ठिकाणी गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहाण करणे,जबरी चोरी,हिसकावुन चोरी करणे याबाबत त्यांचेवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असताना त्यांनी आपले बेकायदेशीर कृत्य करणे जारी ठेवले असल्याचे दिसून आले होते.परिणामी त्यामुळे त्यांचेवर गंभीर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे झाले होते. आरोपीविरुध्द गुन्हे दाखल असुन नमुद गुन्हयास भारतीय न्यायसंहिता २०२३ चे नविन कायदयाप्रमाणे कलम १११ हे वाढीव कलमा करीता उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचेकडुन अपर पोलीस अधीक्षक,कार्यालय श्रीरामपुर येथे प्रस्ताव पाठवीण्यात आला होता.त्याला मंजुरी दिली असल्याने आता त्यांच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे जाणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close