गुन्हे विषयक
महिलेवर बलात्कार,आरोपीस मारहाण,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेली अडीच वर्षे एकमेकाच्या संपर्कात आणि संबंधात राहत असलेल्या जोडप्याचे अचानक बिनसले आणि त्यात संबंधित महिला लग्न करण्यास नकार देत असल्याचा कारणावरून आरोपी आसिफ बशीर सय्यद (वय-४५) याने तिला लाकडी काठीच्या सहाय्याने नको त्या ठिकाणी जोरदार मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी या महिलेने आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या आरोपीस मोठी मारहाण केली असल्याची माहिती आहे.मात्र ती कोणी केली हे उघड झालेले नाही.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भारतात प्रौढ जोडप्यांना लग्नाशिवाय एकत्र राहणे (लिव्ह-इन-रिलेशनशीप) कायदेशीर आहे.यासाठी कोणताही स्वतंत्र,विशिष्ट कायदा नसला तरी,सर्वोच्च न्यायालयाने याला कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा भाग मानले आहे.त्यामुळे युवा पिढी भटकताना दिसत असून हिंदू संस्कृतीवर हा मोठा आघात मानला जात आहे.आज भारतीय संस्कृती श्रेष्ठ दर्जाची समजली जात असताना ही कीड समाजाची वीण नष्ट करताना दिसत आहे.त्यामुळे पाल्याचे जीवन उधळताना दिसत आहे.त्यामुळे समाजाने जागृत होणे गरजेचे आहे.
भारतात प्रौढ जोडप्यांना लग्नाशिवाय एकत्र राहणे (लिव्ह-इन-रिलेशनशीप) कायदेशीर आहे.यासाठी कोणताही स्वतंत्र,विशिष्ट कायदा नसला तरी,सर्वोच्च न्यायालयाने याला कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा भाग मानले आहे.या संबंधांतर्गत स्त्रियांना घरगुती हिंसाचार कायदा,२००५ नुसार संरक्षण आणि पोटगीचा अधिकार मिळतो,परंतु नाते ‘विवाहासारखे’ असणे आवश्यक असल्याची माहिती आहे.त्यामुळे युवा पिढी भटकताना दिसत असून हिंदू संस्कृतीवर हा मोठा आघात मानला जात आहे.आज भारतीय संस्कृती श्रेष्ठ दर्जाची समजली जात असताना ही कीड समाजाची वीण नष्ट करताना दिसत आहे.त्यामुळे पाल्याचे जीवन उधळताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यातील आरोपी व फिर्यादी महिला हे दोन्हीही विवाहित असल्याची माहिती आहे.त्यांना प्रत्येकी दोन दोन अपत्य आहेत.मात्र त्यांचे शहर हद्दीत सुत जमल्यावर त्यांनी दिनाक ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी आपले चंबू गबाळ अन्यत्र हलवले होते.त्या ठिकाणी घर प्रपंच थाटला होता.त्यानंतर सुरुवातीचे दोन अडीच वर्षे नव्या नवलाईचे निघून गेल्यावर आरोपीने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे.त्यामुळे त्यांचे सदर महिलेवर आंतरधर्मीय लग्न करण्याचा दबाव वाढवला होता.त्यातून त्यांचे रंगाचे बेरंग झाले असल्याची चर्चा नजीकच्या खेड्यात सुरू आहे.त्याने दि.०७ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता तिला लग्न करण्याची गळ घातली होती.तिने नकार दिल्याने त्याने पुढील दिवशी दि.०८ मार्च रोजी सदर महिलेला लग्न करण्याचा लकडा लावला होता.मात्र त्यात आरोपीला अपयश आल्याने त्यांचे माथे भडकले होते.त्यातून त्यांचे रूपांतर वितुष्ट येण्यात झाले आहे.

त्या दिवशी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी आसिफ सय्यद याने सदर महिलेला काठीच्या सहाय्याने जोराची मारहाण केली होती.त्यात तीला लाकडी काठीने नको त्या ठिकाणी मारहाण केली असल्याने ती चांगलीच बेजार झाली असल्याची माहिती आहे.अखेर तिने शेवटी संतापून तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी व पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.८६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) एम.११८(१),३५२ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत.



