जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

पत्रकार नानासाहेब जवरे जीवन परिचय

न्यूजसेवा

शिर्डी -(प्रतिनिधी)

  पत्रकार नानासाहेब जयराम जवरे यांचा संक्षिप्त जीवन परिचय.


  श्री.नानासाहेब जयराम जवरे हे एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,आणि शेतकरी संघटनेचे नेते,राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून ओळखले जातात.ग्रामीण विकासापासून ते मोठ्या पाणी प्रकल्पांपर्यंत त्यांनी केलेल्या संघर्षाची नोंद त्यांच्या कारकिर्दीत आहे.


१.  प्राथमिक माहिती
| विभाग | माहिती |
|—|—|
| संपूर्ण नाव | श्री. नानासाहेब जयराम जवरे |
| जन्म तारीख | ०१ जून १९६८ |
| जन्मस्थळ | जवळके, तालुका-कोपरगाव, जिल्हा-अहिल्यानगर (महाराष्ट्र) |
| शिक्षण | आर्ट टीचर डिप्लोमा (A.T.D.) (१९९०), कैलास कला महाविद्यालय बीड. |

*शिक्षण-प्राथमिक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देर्डे- चांदवड,देर्डे-कोऱ्हाळे,जवळके.

*माध्यमिक शिक्षण -शेतकरी माध्यमिक विद्यालय जवळके.

*उच्च माध्यमिक शिक्षण-श्री.ग.र.औताडे महाविद्यालय,पोहेगाव तालुका-कोपरगाव.

*पदविका शिक्षण-कैलास कला निकेतन,बीड.(कमवा शिका या धर्तीवर शिक्षण)अनेक विद्यार्थ्यांना मदत.

*विद्यार्थी दशेतील आंदोलने -सन -१९८१ साली १३ व्या वर्षी जवळके येथील माध्यमिक शाळेत इयत्ता ०७ वीत असताना एका शिक्षकाने सहाय्यक विद्यार्थ्याला शिवी दिल्याने त्या विरोधात आंदोलन.संस्थाचालकांना त्या शिक्षकाची हकालपट्टी करण्यास भाग पाडले.

*सन -१९८५ साली एस.एस.सी.उत्तीर्ण झाल्यावर तरुणांचे संघटन करून ग्रामीण भागात जवळके येथे पहिल्या शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन.

*सन-१९८७ साली बीड येथील कैलास कला महाविद्यालयात असताना महाविद्यालयातील अव्वल कारकून यांनी परीक्षा शुल्क भरण्यास मुदतपूर्व नोटीस न दिल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याचा धोका वाढल्याने विद्यार्थ्यांना संघटित करून बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोर्चा काढून संबंधित कारकून यांना माफी मागण्यास भाग पाडून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यास जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना भाग पाडले.


| सद्य भूमिका | शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख (२०२४ पासून),पूर्णवेळ पत्रकारिता,जाहिरात व्यवसाय.
२) व्यावसायिक आणि आरंभीची कारकीर्द
श्री.जवरे यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम करून प्रशासकीय व व्यावसायिक अनुभव घेतला:
* व्यवसाय: शेती,महावितरण कंपनीचे कंत्राटदार (१९९२-९३), ट्रॅक्टर-ट्रान्सपोर्ट व्यवसाय (१९९५-९६), ट्रकसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय (२००२-२००७).
* नोकरी:अकोले (अहिल्यानगर) येथील मूकबधिर शाळेत १ वर्ष नोकरी (१९९४).
* सध्याचा व्यवसाय: कौस्तुभ (जाहिरात) ॲड.एजन्सीची स्थापना (२०२३).
३) गावपातळीवरील नेतृत्वाचा ठसा (जवळके ग्रामपंचायत)
गावपातळीवर त्यांनी भ्रष्टाचारमुक्त विकासाचे आदर्श उदाहरण उभे केले:

* जवळके ग्रामपंचायत हद्दीत गेली ३०-३५ वर्षे प्रस्थापितांच्या विरोधात लोकवर्गणीतून पॅनल,भ्रष्टाचार विरहित मतदान राबविण्यास पुढाकार त्याला प्रमुख कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा मोठा सहभाग.

* ग्रामपातळीवर अनेक भ्रष्टाचार उघड करून सरकारी पैसा पुन्हा शासकीय तिजोरीत भरण्यास भाग पाडले.

  • ग्रामपातळीवर जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून अनेक वैद्यकीय,रक्तदान शिबिरे,मोफत वैद्यकीय शिबिरे घेऊन ग्रामस्थांना जगणे सुसह्य केले.
  • * कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी एका पाणी वाटप सहकारी संस्थेच्या मंजुरीसाठी गुंतवल्या होत्या.त्यावर संस्थेचे नाव लागल्याने त्यांना कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ घेता येत नव्हता व खातेवाटप होत नव्हते.त्या सोडवण्यासाठी आंदोलन केले.त्यांच्या नावावरील कर्ज एका सहकारी साखर कारखान्याच्या नेत्यास भरण्यास भाग पाडले.
  • डिसेंबर सन-१९९२ जवळके ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्यात विजयी,पंचवार्षिक मध्ये प्रस्थापितांचे अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले.


* राजकीय संघर्ष: सन- १९९७ साली स्वतंत्र राजकीय पॅनल उभे करून अपायकारक प्रस्थापित विचारधारेला संघर्ष देत बहुमताने विजय मिळवला आणि गावात अनेक भ्रष्टाचारमुक्त विकासकामे केली.

  • जवळके येथे सहकारी मित्र आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्याने दिनांक ०१ जानेवारी १९९९ रोजी आठवडे बाजार सुरू तो अव्याहत सुरू आहे.

* पुनर्नियुक्ती: डिसेंबर २०२२ मध्ये लोकवर्गणीतून त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल पुन्हा बहुमताने विजयी झाले.


* पुरस्कार: जवळके ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, लोकराज्यग्राम पुरस्कार आणि वनराईचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री स्व.मोहन धारिया यांच्या हस्ते हरितग्राम पुरस्कार प्राप्त झाले.याशिवाय २०२४ साली जवळके ग्रामपंचायतला जिल्ह्यात प्रथम ‘क्षयमुक्त ग्राम पुरस्कार ‘ प्राप्त,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे हस्ते पुरस्कार प्रदान.


४) पत्रकारिता आणि पत्रकार संघटन
सन १९९८ पासून त्यांनी ग्रामीण पत्रकारितेत सक्रिय सहभाग घेतला आणि पत्रकारांना संघटित केले:२००९,२०१० व २०१४ साली शिर्डी राज्य व जिल्हास्तरीय पत्रकारांचे अधिवेशन घेऊन त्यांचे प्रश्न तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,ग्रामविकास मंत्री आर.आर.पाटील,कृषीमंत्री राधाकृष्ण विखे,बबनराव पाचपुते,खा.बाळासाहेब विखे,खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह अनेक मुख्यमंत्र्यांसमोर मांडून न्याय मिळविण्याचा प्रयत्न.
* कार्य: ग्रामीण पत्रकारिता व जाहिरात व्यवसायास सुरुवात.दैनिक गावकरीमध्ये उपसंपादक, तर दैनिक जनप्रवासमध्ये वृत्त संपादक म्हणून काम.

*सन -२०१७ साली लेखन अडचणीचे वाटत असल्याने राजकीय नेत्याने संपादक,मालक यांच्यावर राजकीय,आर्थिक दबाव आणून वर्तमानपत्रे काढून घेतली.परिणामी स्वतःचे ‘जनशक्ती’ न्यूज वेब पोर्टल सुरू केले.आज त्याचेच नाव ‘न्यूजसेवा ‘ वेब पोर्टल आहे.वर्तमानात अहिल्यानगर,नाशिक व राज्यात सर्वाधिक विश्वसनीय व लोकप्रिय वेब पोर्टल गणले जाते.त्यातून प्रस्थापिताविरुद्ध अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली.


* पुरस्कार: ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार (मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. साबळे यांच्या हस्ते, २००२).
* पत्रकार संघटना:

पत्रकार नानासाहेब जवरे.


   * महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष (२००९ पासून १० वर्षे) आणि जिल्हाध्यक्ष (२०१०).
   * राज्यातील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अधिवेशन (२०१०) यशस्वी करून पत्रकारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
५) सामाजिक लढ्यांची महत्त्वपूर्ण कारकीर्द
श्री. जवरे यांच्या कार्याची खरी ओळख त्यांच्या यशस्वी सामाजिक लढ्यांनी आहे:

निळवंडे कालव्यांचे पाणी दुष्काळी भागात पहिल्यांदा आल्यावर जलपूजन करताना नानासाहेब जवरे,ॲड.अजित काळे,अध्यक्ष रूपेंद्र काले,मातोश्री स्व.गंगूबाई जवरे,ज्येष्ठ भगिनी कमलबाई मारुती पोकळे आदी मान्यवर.


अ) पाणी आणि पायाभूत सुविधा
* उजनी चारी लढा (१९९३): कोपरगाव तालुक्यातील १३ दुष्काळी गावांसाठी उजनी चारी मिळवण्यासाठी यशस्वी लढा,ज्यामुळे १९९५ साली युती शासन काळात भाजप प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पा.वहाडणे यांचे सहकार्याने ₹ ३.८४ कोटींचा निधी मंजूर झाला.

नगर -नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ वरदान ठरणारे निळवंडे धरण.


*सन-१९९८ साली जवळके,शहापूर,बहादराबाद आदी तीन गावांची जवळके प्रादेशिक नळ पाणी योजनेचा ०२ कोटींचा निधी राजकीय अनास्थेमुळे परत चालला असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरूध्द आमरण उपोषण केले.ऐन पोळ्याच्या दिवशी काम सुरू केल्याने आज तीन गावांना पिण्याचे पाणी मिळत आहे.
* शिर्डी विमानतळ निर्मिती (२००६): काकडी येथे विमानतळ व्हावे यासाठी शेतकरी व ग्रामस्थांना जमीन देण्यासाठी प्रवृत्त केले.या योगदानाबद्दल ‘चौथास्तंभ’ पुरस्कार (मनसे संस्थापक राज ठाकरे यांच्या हस्ते) आणि विमानतळ प्राधिकरणाकडून गौरव झाला.
*सन -२००६ साली मार्च महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फॉर्म मधील पक्षांवर ‘बर्ड फ्ल्यू ‘ हा आजार आला असता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यावेळी मार्च महिन्यात आधी लाक्षणिक उपोषण केले.नंतर मे महिन्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोपरगाव तहसील समोर अनेक शेतकऱ्यांना घेऊन ‘आमरण उपोषण’ केले.चार दिवसांनी याबाबत महाराष्ट्र विधानसभा उन्हाळी अधिवेशनात जोरदार चर्चा होऊन शेतकऱ्यांना प्रती पक्षी २० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली व मागील पाच वर्षाचे थकलेले २०० कोटीं असे एकूण २२० कोटीं रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे.दरम्यान राज्य पोल्ट्री संघटनेची स्थापना केली असून पोल्ट्री संघटनेने संस्थापक आहे.

नानासाहेब जवरे यांची धर्मपत्नी मेघना जवरे.


*शिर्डी साईबाबासाठी सर्वात जवळचा ठरणारा नाशिक-वावी,सायाळे -जवळके मार्गे रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सन १९९६-९८ साली वर्ग केला आहे.त्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री स्व.अशोकराव डोणगावकर यांचेकडे पाठपुरावा केला आज सर्व साई दिंड्या या जवळच्या मार्गाचा वापर करत आहे.
* सन -१९९७ ते २००२ दरम्यान जवळके आणि परिसरातील पाच किमी परिघात एक लाखाहून अधिक वृक्ष लागवड करून रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई निर्माण केली आहे.

* शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या २००९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि विजयात महत्वपूर्ण भूमिका.


*सन -२०१५ साली शिर्डी साईभक्तांना सर्वात जवळचा ठरणारा साई पालखी रस्ता नाशिक वावी,जवळके मार्गे शिर्डी साठी दुहेरी करणेसाठी नितीन गडकरी यांचेकडून १० कोटीं रुपयांचा निधी प्राप्त.
ब) सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात संघर्ष
* ‘परीवाला गाव’ उच्चाटन (२०११): कोपरगाव तालुक्यातील येसगाव, खिर्डी गणेश येथील कुप्रसिद्ध वेश्या व्यवसायाविरुद्ध महिला सरपंच व ग्रामस्थांना पाठिंबा देत वृत्तमाला लेखन केले.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पी. अंबलगण व पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश दखल घेऊन ढाबे उद्ध्वस्त केले.या कार्यासाठी राज्यस्तरीय संत सावता माळी पुरस्कार प्रदान.


* गुन्हेगारीवर नियंत्रण: शिर्डीतील अवैध व्यवसाय, खिसेकापू गुंडगिरी आणि साई संस्थानमधील भ्रष्टाचाराविरुद्ध लेखन करून प्रशासकीय कारवाई करण्यास प्रवृत्त केले.
* भोंदू बाबांचा पर्दाफाश: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडी विमानतळ,मळेगांव थडीसह अनेक भोंदू बाबांचे पितळ उघड करून सामान्य नागरिकांना न्याय दिला.
* बनावट बलात्काराच्या आरोपांविरुद्ध लढा (२०१७): जनतेची दिशाभूल करणाऱ्या जमावाचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला,परंतु दंगल आणि मनुष्यहानी टाळली.
क)  निळवंडे प्रकल्प पूर्णत्वाचा ऐतिहासिक संघर्ष
५५ वर्षे रखडलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-२) प्रकल्पासाठीचा त्यांचा लढा विशेष महत्त्वाचा आहे:
| वर्ष | घटना |
|—|—|
| २०१२ | १८२ गावांसाठी (आता १९० गावे) वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सामाजिक लढ्यास सुरुवात. |

*सण – २००९ साली खा.भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाल्यानंतर त्यांचे सहकार्याने तत्कालीन केंद्रीय जलसंसाधन मंत्री हरीश रावत,उमा भारती यांचे मार्फत निळवंडे प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता सन-२०१४ अखेर मिळवल्या.उर्वरित मान्यता देण्यास स्थानिक नेत्यांनी अडचणी निर्माण केल्याने उच्च न्यायालय ॲड.अजित काळे यांच्या मोफत विधी सहाय्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून उर्वरित मान्यता मिळवल्या.
| २०१४ | खडकेवाके येथे शांत बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांमार्फत लाठीहल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल.तत्कालीन मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी माध्यमांसमोर माफी मागितली. (२०२३ मध्ये कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष सुटका).अनेक गुन्हे अंगावर घेतले.आजही अनेक खटले न्यायालयात सुरू.


| २०१६ | ॲड.अजित काळे यांच्या मोफत विधी सहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल.

* सन-२०२७ साली गुरु पौर्णिमेच्या दिवशी एक मोठा मोर्चा चुकीच्या माहितीवर होत असल्याचे सत्य छापल्याने शहराची शांतता धोक्यात आल्याने कार्यालयावर मोठ्या जमावाने जाऊन असामाजिक तत्वांनी केला हल्ला,कार्यालयाची सुमारे २.५० लाखांचे नुकसान.सुदैवाने जीवित हानी नाही.


| २०१९ | उच्च न्यायालयाचे आदेश मिळवून,जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले आणि २२५ पोलिसांच्या बंदोबस्तात अडवलेले कालव्यांचे काम सुरू केले.दुष्काळी भागातील साठवण तलाव,पाझरतलाव,के.टी.वेअर भरण्यास ३१ मे २०२३ पासून सुरुवात,वितरण व्यवस्था अंतिम टप्प्यात.

*सन -निळवंडे धरणातील ०७ तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेले ८.३२ टी.एम.सी.पाणी १५ टक्क्यांच्या नावाखाली लाभक्षेत्राच्या बाहेरील शिर्डी,कोपरगाव शहरांना पळविल्याचा डाव उच्च न्यायालयातून हाणून पाडला.

* सन -२०२० साली राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यावर माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे सहकार्याने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची २९ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोना काळात मंत्रालयात भेट घेऊन विस्तृत चर्चा करून त्यांचेकडून दोन वर्षात निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांसाठी १०५६ कोटी रुपयांचा विक्रमी निधी मिळवला.

* निळवंडेचा दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण मुंबई,आणि उच्च न्यायालयात लढा सुरू.


| २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कालव्यांचे उद्घाटन (३१ मे २०२३) संपन्न.


| २०२४ | या लढ्याची दखल घेऊन शेतकरी संघटनेने प्रदेश प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांची निवड केली. |
पुढील पायरी


हा परिचय पत्र (Profile) श्री. नानासाहेब जवरे यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा व्यापक आढावा देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close