जाहिरात-9423439946
आरोग्य

..या गावात टपऱ्या उघड्या ठेवल्या,दोघांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता माहित असतानाही आपल्या टपऱ्या उघड्या ठेऊन मानवी जीविताला धोका उत्पन्न करण्याचा गुन्हा केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल केल्याने बेजाबदार नागरिकांत खळबळ उडाली आहे.

काही नागरिक व व्यापाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे देशात सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू केला आहे.व सर्व व्यापाऱ्यांना आपापली दुकाने,आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.तरीही काही महाभाग आपला क्षुल्लक स्वार्थ साधण्यासाठी जनतेची सर्वोच्च सुरक्षा पणाला लावीत आहेत.

देशातील कोरोनास्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे.तर राज्यात हि संख्या १०१ वर पोहचली आहे.या विषाणूमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहे.भारतातील ५४८ जिल्हे बंद ठेवण्यात आले आहे.तर ३० राज्ये याच स्थितीत आहे.महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.सरकार एकीकडे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकीकडे कठोर उपाययोजना करत असताना नागरिक या प्रयत्नांवर पाणी फिरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.हि अत्यंत गंभीर बाब असून याच बेपर्वाईमुळे देशात सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू केला आहे.व सर्व व्यापाऱ्यांना आपापली दुकाने,आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.तरीही काही महाभाग आपला क्षुल्लक स्वार्थ साधण्यासाठी जनतेची सर्वोच्च सुरक्षा पणाला लावीत आहेत.अनेक जण आपल्या गाड्या उडवीत शहरात हुंदडत फिरताना दिसत असून प्रशासनाला आपले नाक खाजवून दाखवत आहेत.

या बेपर्वाईची गंभीर दखल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घेतली असून आज सकाळी १०.२८ वाजेच्या सुमारास आढाव वस्ती येथील आरोपी नथू नारायण कदम (वय-६६) यांच्यासह कोपरगाव शहरातील सुदेश थिएटर जवळ असलेल्या विशाल व्हरायटीज नावाच्या पान टपरीचे मालक अरुण मंसाराम पंडोरे (वय-६६) या दोघांविरुद्ध पोलीस कर्मचारी अनुक्रमे जयदीप दामोदर गवारे, व सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहरात नागरिकांना जाहीर आवाहन करूनही काही व्यापारी आजही आपली दुकाने उघडी ठेऊन जनतेचा जीव धोक्यात घालत आहेत.याची गंभीर दखल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घेतली असून आज सकाळी १०.२८ वाजेच्या सुमारास आढाव वस्ती येथील आरोपी नथू नारायण कदम (वय-६६) यांच्यासह कोपरगाव शहरातील सुदेश थिएटर जवळ असलेल्या विशाल व्हरायटीज नावाच्या पान टपरीचे मालक अरुण मंसाराम पंडोरे (वय-६६) या दोघांविरुद्ध पोलीस कर्मचारी अनुक्रमे जयदीप दामोदर गवारे, व सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे,व बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.या घटनेने बेशिस्त दुकानदार व टपरी चालकांत खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close