जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात तरुणांत मारहाण,तीघांवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव नजीक असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्रवेशद्वाराचे समोर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात नुकतीच मारहाण झाली असल्याची घटना ताजी असताना कोपरगाव शहरातील कोपरगाव येथील न्यायालयानजिक बसलेला व निंबारा येथील रहिवासी असलेला तरुण शकील इसाक शेख (वय-18) याला समीर शेख,कृष्णा कार्तिक,यश काळे या तिघांनी बेदम मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

 

   अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गेल्या काही काळापासून किरकोळ कारणांवरून होणाऱ्या तुंबळ हाणामारी,रस्त्यावरील गुंडगिरी आणि दोन गटांमधील हिंसक वादाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नवीन अधिकारी उद्धव डमाळे पोलिस ठाण्यात रुजू झाल्याने त्यांचेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहे.असे असताना कोपरगाव शहरात एक हाणामारीचे घटना उघडकीस आली आहे.यातील फिर्यादी तरुण हा निंबारा येथील रहिवासी आहे.तो मजुरी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो.मात्र नुकताच तो  कोपरगाव येथील न्यायालय परिसरात रात्रीच्या सुमारास बसला असताना त्याचे जवळ समीर शेख,कृष्णा कार्तिक,यश काळे हे तीन आरोपी आपल्या दुचाकीवरून आले व त्यांनी त्यास मागील किरकोळ कारणावरून शिवीगाळ सुरू केली होती.त्यावेळी फिर्यादीचे त्यास तसे करण्यास हरकत घेतली असता.त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला.तो पळून जवळच्या पश्चिमेस जवळपास शंभर मीटर असलेल्या इनडोअर हॉल परिसरात आला असता
आरोपींनी त्यास गाठून त्याला शिवीगाळ करुन बेल्टने डोक्यात,हातावर,मानेवर मारहाण करत लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली आहे.शिवाय,” आमचे नादी लागला तर तुला जीवे ठार मारून टाकू” अशी धमकी दिली आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला आहे.त्याने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 521/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1),115(2),351(3),352,3(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल रोकडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close