जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा,आरोपीस जामीन मंजूर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील खडकी कोपरगाव येथील आरोपी करण विनोद वाघ यास कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्या.दिपक डी.आलमले यांनी नुकताच नियमित जामीन मंजूर केला असल्याची माहिती हाती आली आहे.

“फिर्यादीत व्हिडिओ व मेसेजच्या मजकुराबाबत कोणताही तपशील नाही,तसेच आरोपीने आत्महत्येस नेमके कसे प्रवृत्त केले याचाही तपशील नाही.गुन्ह्याची परिस्थिती व कोठडीचा कालावधी विचारात घेऊन न्यायालयाने रु.३० हजार च्या वैयक्तिक व जामीनदाराच्या बंधपत्रावर आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे.

   या गुन्ह्यातील फिर्यादी दिपाली व्यवहारे यांच्या फिर्यादीनुसार,त्यांची बहीण भारती हिला आरोपी करण वाघ हा मागील चार-पाच महिन्यांपासून त्रास देत होता व कॉल हिस्ट्री,मेसेज आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत होता.या त्रासाला कंटाळून भारती हिने दि.९ सप्टेंबर २०२६ रोजी आत्महत्या केली होती असा त्यावर आरोप आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं.५०१/२०२६ मधील या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व कलम ३५१ (२) (धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंद झालेली आहे.

  सदर आरोपीने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४८३ अन्वये नियमित जामिनासाठी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज (क्र.२०७/२०२६) केला होता.सरकार पक्ष,तपासी अधिकारी व फिर्यादी यांनी अर्जास विरोध करत तपास सुरू असून पुराव्यांशी छेडछाड व साक्षीदारांवर दबावाची शक्यता असल्याचे म्हणणे मांडले होते.आरोपीतर्फे युक्तिवाद करताना,आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दर्शविणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नसल्याचे,आरोपीचा मोबाईल तपासी अधिकाऱ्यांनी आधीच जप्त केला असल्याचे आणि आरोपी दि. १० सप्टेंबरपासून कोठडीत असल्याने पुढील अटकेची आवश्यकता नसल्याचा आरोपीच्या वकिलांनी दावा केला होता.

  याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाने नमूद केले की,”फिर्यादीत व्हिडिओ व मेसेजच्या मजकुराबाबत कोणताही तपशील नाही,तसेच आरोपीने आत्महत्येस नेमके कसे प्रवृत्त केले याचाही तपशील नाही.गुन्ह्याची परिस्थिती व कोठडीचा कालावधी विचारात घेऊन न्यायालयाने रु.३० हजार च्या वैयक्तिक व जामीनदाराच्या बंधपत्रावर आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे.जामिनाच्या प्रमुख अटी कायमचा पत्ता व मोबाईल क्रमांक तपासी अधिकाऱ्यांना द्यावा.दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तपासी अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे.साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.जयंत आत्माराम जोशी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.संकेत जानी,ॲड.सुरेंद्र जाधव व ॲड.तन्मय घोडके यांनी सहकार्य केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close