कोपरगाव तालुका
..यांच्या हलगर्जीपणामुळे शहर बंद करण्याची नामुष्की !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात कोरोनाने शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात सरकारने जमाव बंदी पाठोपाठ संचारबंदी करूनही नागरिक शहरात फिरण्याच्या आपल्या मर्कटलीला बंद करत नाही हे ओळखून कोपरगाव तालुका व शहर प्रशासनाने अखेर प्रतिबंधात्मक उपाय (बॅरिकेटींग) करून शहर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हि शहरातील नागरिकांसाठी नक्कीच लांच्छनास्पद बाब समोर आली आहे.
अशाच बेपर्वाईमुळे इटली,स्पेन,फ्रांस,अमेरिका आदी प्रगत देशात विषाणूने अनेकांचा बळी घेतला आहे.अनेकांनी सरकारच्या प्रयत्नांची चेष्टा केली.संचारबंदीची टर उडवताना वृद्धांना “कोरोना” म्हणून हेटाळणी केली.अनेकांनी आयोजित पार्ट्यांना”कोरोना पार्ट्या” नाव देऊन सरकारची टिंगल केली.परिणाम आज सर्वच जण भोगत आहे.अखेर सरकारला कठोर होऊन संचार बंदी जाहीर करून अनेकांना हजारोंचा दंड ठोठावा लागला.अनेकांना समुद्र किनारे फिरण्यास बंद करावे लागले.स्पेन या देशाने नागरिकांना उचलण्यासाठी तर हेलिकॉप्टरचा वापर केला.मात्र परिणाम मात्र तो पर्यंत होऊन गेला होता.देशात व विविध राज्यात त्याचा प्रसार झाला होता.आज त्या देशात माणसे किडा-मुंगी सारखे मरत आहेत.
देशातील कोरोनास्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे.तर राज्यात हि संख्या १०१ वर पोहचली आहे.या विषाणूमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहे.भारतातील ५४८ जिल्हे बंद ठेवण्यात आले आहे.तर ३० राज्ये याच स्थितीत आहे.महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.सरकार एकीकडे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकीकडे कठोर उपाययोजना करत असताना नागरिक या प्रयत्नांवर पाणी फिरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.हि अत्यंत गंभीर बाब असून याच बेपर्वाईमुळे इटली,स्पेन,फ्रांस,अमेरिका आदी प्रगत देशात विषाणूने अनेकांचा बळी घेतला आहे.अनेकांनी सरकारच्या प्रयत्नांची चेष्टा केली.संचारबंदीची टर उडवताना वृद्धांना “कोरोना” म्हणून हेटाळणी केली.अनेकांनी आयोजित पार्ट्यांना”कोरोना पार्ट्या” नाव देऊन सरकारची टिंगल केली.परिणाम आज सर्वच जण भोगत आहे.अखेर सरकारला कठोर होऊन संचार बंदी जाहीर करून अनेकांना हजारोंचा दंड ठोठावा लागला.अनेकांना समुद्र किनारे फिरण्यास बंद करावे लागले.स्पेन या देशाने नागरिकांना उचलण्यासाठी तर हेलिकॉप्टरचा वापर केला.मात्र परिणाम मात्र तो पर्यंत होऊन गेला होता.देशात व विविध राज्यात त्याचा प्रसार झाला होता.आज त्या देशात माणसे किडा-मुंगी सारखे मरत आहेत.व जवळचे नातेवाईक,प्रशासन हताश होऊन पाहात आहे.दवाखान्यात आज भरती करायला जागा नाही.६०-६५ वयावरील नागरिकांना वाचावयाचे कि २०-२५ तील तरुणांना हा पेच तयार होऊन प्रशासनाला नियोजन करून नाईलाजाने दुसरा पर्याय निवडण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.अनेकांना आपल्या नातेवाईकांचे अंत्यविधी करण्याचे भाग्य लाभले नाही.लष्कराला ट्रक मध्ये भरून मुख्य शहरापासून दोनशे कि.मी.अंतरावर त्यांचा सामूहिक अंत्यविधी उरकावा लागला आहे.
…चार उनाड टोळक्यांमुळे आज या हातावर पोट असलेल्या हताश नागरिकांचा काय दोष !अंतापुरहून आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या वृद्धाला गोदावरी पेट्रोल पंपाशेजारी बसून आपले पोट “कच्चे टोमाटो” खाऊन भरावे लागत आहे.याला कोण दोषी आहे याचा सुज्ञांनी विचार केलेला बरा.
जनतेने गर्दी केल्याने अखेर भाजीबाजार बंद करण्याची दुर्दवी वेळ शहर प्रशासनावर आली परिणामी आज या ठिकाणी कडकडीत बंद आढळून आला आहे.
भारतात आज त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.किमान ते पाच्छात्य देश प्रगत तरी आहे.आपली काय अवस्था होईल याचे भान ठेवणे आवश्यक आहे.प्रत्येक वेळी तालुका आणि शहर प्रशासनाकडे वृत्त संकलनाच्या निमित्ताने जाण्याचा योग येत आहे.त्या त्या वेळी प्रशासन हताश होऊन जनतेच्या “बेपर्वाईचीच” चर्चा करताना दिसत आहे.हे कोणत्याही सुज्ञ नागरिकांसाठी लांच्छनास्पद आहे.याचे भान ठेवणे आवश्यक आहे.जीव जनतेचा वाचवायचा आणि दंडे मात्र त्यांनीच हाणावे याला,”जळो जिने लाजिरवाणेच” म्हणावे लागेल.ज्या देशात जनतेला आपल्या जीवाचे मोल समजत नसेल तो देश “देश” म्हणावयाच्या लायकीचा आहे का ? हा खरा प्रश्न आहे.अशी बेपर्वाई सर्वांना म्हणजेच ज्यांचा काहीच दोष नाही त्यांचा बळी घेईल हि बाब गंभीयाने घेणे अगत्याचे आहे.त्यात तुमचे-आमचे सर्वांचे नातेवाईक,शेजारी पाजारी,सर्वच येतील याचे भान आवश्यक आहे.त्यामूळे सुज्ञ नागरिकांनी प्रशासन जे आदेश देईल ते आपल्या हिताचे आहे असे समजून त्याची अंमलबजावणी करावी देशाच्या ईतिहासात अद्याप पर्यंत तीन युद्धे झाली तेंव्हाही रेल्वे सेवा बंद झालेली नाही.याचे गांभीर्य या घटनेचे गांभीर्य जाणवू देण्यास पुरेसे वाटते इतकेच या निमित्ताने.